साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
येथे दुर्गा माता दौडला युवक, महिलांसह चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाविकांची गर्दी वाढत आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून येथे नवरात्रीनिमित्त दुर्गा माता दौडचे आयोजन करण्यात येतेे. पहिल्या दिवशी येथील श्रीराम मंदिरापासून दौडचे आयोजन केले जाते. त्यानंतर गावातील चारही बाजूने दौडचे आयोजन करून हातात मशाल, डोक्यावर सफेद टोपी घालून तरुण दौडमध्ये सहभागी होतात. ही दौड गावातील टेकडीवरील भवानी माता मंदिर येथे जाऊन तेथे पूजा-अर्चा करून तिचा समारोप होतो. यावेळी विविध घोषणा दिल्या जातात. सकाळी सहा वाजता ही दौड निघत आहे. दौडमध्ये रोजच गर्दी वाढत आहे. यावेळी पाळधी पोलीस चौकीचे कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवतात.