नवरात्र उत्सवासाठी मनुदेवी प्रशासन सज्ज

0
46

साईमत, धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर

सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवीच्या नवरात्रोत्सवाला रविवारी, १५ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. यंदा सप्तमी आणि अष्टमीला शनिवार आणि रविवारची सुट्टीचा योगायोग येत आल्याने दोन दिवस मनुदेवीच्या चरणी लाखो भाविकांची उपस्थिती लाभणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे प्रशासनालाही खबरदारी व उपाययोजना घ्यावी लागली होती. श्री क्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठानलाही परिश्रम घ्यावे लागले.

नवरात्रोत्सवानिमित्त आणि भाविकांच्या सुख-सोयी सुविधा करीता मनुदेवी मंदिराच्या सभागृहात यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या अध्यक्षतेखाली व फैजपूर विभागीय पोलीस अधिकारी कृणाल सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी यावल पो.नि.राकेश मानगावकर, यावल बस आगाराचे वाहतूक नियंत्रक विकास करांडे व कर्मचारी, वनविभागाचे वनपाल विपुल पाटील, कर्मचारी, सां.बा.वि.चे अधिकारी, प्राथमिक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आडगावचे सरपंच आमिना रसीद तडवी, तलाठी आर.के.गोरटे, पोलीस पाटील संघटनेचे अशोक पाटील, परिसरातील पो. पाटील, मनुदेवीचे संस्थाध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव निळकंठ चौधरी, खजिनदार सोपान वाणी, विश्वस्त सतीश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुनील महाजन, चिंधु महाजन, भूषण चौधरी, योगेश पाटील, चंदन वाणी, नितीन पाटील यांच्यासह विश्वस्त, कर्मचारी उपस्थित होते.

गावातील मेन रस्ता मोकळा करा; ग्रामस्थांकडून अपेक्षा

आडगाव आणि कासारखेडा ही जोड गावे आहे. नवरात्रोत्सवात भाविकांच्या वाहनांची आणि बसेससाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. त्यामुळे आडगाव रस्त्यावर काहीजण बैलगाडी, गुरेढोरे बांधून ठेवतात. त्यामुळे वाहने काढताना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे ग्रामस्थांनी निदान नवरात्रोत्सव काळात रस्ता मोकळा ठेऊन यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here