Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मायबाप कॉलेजमध्ये लेकरांचा जमला गोतावळा
    जळगाव

    मायबाप कॉलेजमध्ये लेकरांचा जमला गोतावळा

    SaimatBy SaimatOctober 11, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बहुजन समाजातील १८ पगड जातीमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आधार ठरलेल्या मायबाप कॉलेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नूतन मराठा महाविद्यालयात १९९१ च्या तृतीय वर्षाच्या बॅचमधील लेकरांचा गोतावळा अर्थात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात झाला.

    यावेळी तत्कालीन प्राध्यापकांची उपस्थिती होती. व्यासपीठावर 1991 च्या बॅचचे माजी विद्यार्थी आणि कॉलेजचे प्राचार्य डॉ. एल.पी.देशमुख,यांच्यासह प्रा.व्ही.एस.सोनवणे, प्रा. एस.जे.जाधव,उपप्राचार्य डॉ.माधुरी पाटील, डॉ.के. बी.पाटील, प्रा.डॉ.बी.के.सोनवणे, प्रा.डॉ.पांडुरंग (राजू सर) पाटील आदी उपस्थित होते.

    यावेळी डॉ.अशोक पांडव, संजय चौधरी, प्रसन्न मांडे, सुनील लाठी, आबासाहेब पाटील,विजय देसाई, उमेश पाटील, आर जी पाटील यांनी गुरुजनांचा सन्मान केला. सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि सध्या करीत असलेल्या कार्याची माहिती दिली.
    केंद्र सरकारचे डेप्युटी सॉलिसिटर जनरल एडवोकेट अजय तल्हार, ग. स.चे माजी अध्यक्ष मनोज पाटील,पत्रकार चुडामण बोरसे, माजी नगरसेवक जितेंद्र मुंदडा, वीज वितरण कंपनीतील संजय डोंगरदे, संजय कुलकर्णी (अंकलेश्वर), सचिन बोरसे, सुहास चव्हाण, दिनेश बडगुजर, उषा चौधरी, मनीषा जगताप – शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन वैशाली डोहोळे- रावेरकर यांनी तर आभार प्रा.पांडुरंग पाटील यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश बागडे

    March 23, 2026

    Varangaon : वरणगाव रस्त्यावर मालवाहू गाडी जळून खाक

    March 23, 2026

    Narendra Modi On War : पश्चिम आशियातील युद्धावर भारताची संतुलित भूमिका; लोकसभेत पंतप्रधान मोदींचे स्पष्ट विधान

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.