Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भुसावळ»छंद जोपासूनही मानसिक तणाव होतो दूर
    भुसावळ

    छंद जोपासूनही मानसिक तणाव होतो दूर

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 10, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

    मानसिक आजारी असणे ही आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात साधारण गोष्ट आहे. मानसिक आजाराबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे. व्यक्ती जेवढ्या मोठ्या पदावर पोहोचतो तेव्हा त्याच्या संभाषणावर मर्यादा येतात. व्यक्त झाल्याने मानसिक तणाव कमी होतो. छंद जोपासूनही मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते, असे प्रतिपादन डॉ.केतकी पाटील यांनी केले. डॉक्टर केतकी पाटील फाउंडेशनतर्फे आयोजित ‘जगावे आनंदे’ मानसिक आरोग्य (मेंटल स्ट्रेस) कार्यक्रमाचे डीवायएसपी कार्यालय भुसावळ येथे मंगळवारी, १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी डीवायएसपी कृष्णांत पिंगळे, डीवायएसपी पवार, डॉ. विलास चव्हाण, डॉ. बबन ठाकरे आदी उपस्थित होते .

    सण आणि उत्सव काळात पोलीस सतत कार्यरत असतात. त्यामुळे पोलिसांना मानसिक त्रास होतो. दररोज वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्तींशी त्यांचा संपर्क होतो. त्याचाही परिणाम होत असल्याचे डीवायएसपी पिंगळे यांनी सांगितले. डॉ. विलास चव्हाण यांनी स्ट्रेस मॅनेजमेंट कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. मानसिक आजार कुणालाही होऊ शकतो. कुणापेक्षा अधिक आत्महत्या होत असतात. खेळ खेळल्याने तणाव कमी होत असतो. समस्यांबद्दल बोला, शारीरिक फिटनेस महत्त्वाची आहे. जर स्ट्रेस मॅनेज होत नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या, असे सांगितले.

    उपस्थितांच्या प्रश्नांची डॉक्टरांनी दिले उत्तरे

    डॉ. बबन ठाकरे यांनी गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. स्वतःला वेळ द्या, तुमचा तणाव निश्चित कमी होईल. स्वतःला व्यक्त करा, असे सांगितले. यानंतर उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे डॉक्टरांनी दिले. अनेकांच्या शंकांचे समाधान करण्यात आलेे. कार्यक्रमाला भुसावळ विभागातील पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी उपस्थित होते. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी आभार मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Bhusawal : साकेगाव येथील नवोदय विद्यालयाच्या सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल आढावा

    February 5, 2026

    Bhusawal : १० लाखांची आर्थिक फसवणूक आणि धमक्या

    February 4, 2026

    Bhusawal : संतोषी माता सभागृहाचा ताबा भुसावळ नगरपालिकेकडे

    February 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.