साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव उर्वरित जिल्हास्तरीय जिल्हा असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय खो-खो १४ व १७ वर्षाआतील मुले व मुलींच्या खो-खो स्पर्धा येथील छत्रपती क्रीडा संकुलात नुकत्याच उत्साहात पार पडल्या. याप्रसंगी १४ व १७ वर्षाआतील मुलांच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात धानोरा येथील झि.तो. महाजन माध्यमिक विद्यालय आणि नामदेवराव भावसिंग पाटील ज्युनिअर कॉलेजच्या संघाने समाज विकास विद्यालय, शिंदाड दोन्ही संघाचा एक डाव २ गुणांनी पराभव करत विभागीय स्तरावर मजल मारली आहे. हे दोन्ही संघ विभाग स्तरावरील खांडबारा येथे होणाऱ्या सामन्यांसाठी पात्र ठरले आहेत.
यावेळी राज्य क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात, इंग्लिश मेडिअम स्कुल, धानोरा सदस्य ॲड.अविनाश पाटील, सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक दिलीप सूर्यवंशी, सुरेश महाजन, आर.टी.पाटील, किशोर राजकुळे, वासुदेव महाजन, मकरंद महाजन, क्रीडा शिक्षक वासुदेव महाजन आदी उपस्थित होते. पंच म्हणून पूजा कन्नोरकर, पूजा चौधरी, पराशर महाजन, गौरव महाजन, नयन महाजन, मकरंद महाजन आदींनी काम पाहिले. विजयी संघाना क्रीडा शिक्षक वासुदेव महाजन, देविदास महाजन, गौरव महाजन, नयन महाजन, पराशर महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. दोन्ही संघाच्या विजयी खेळाडूंचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.