Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»चक दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघ हाँगकाँगचा पराभव करत उपान्त्य फेरीत
    क्रीडा

    चक दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघ हाँगकाँगचा पराभव करत उपान्त्य फेरीत

    Kishor KoliBy Kishor KoliOctober 3, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    हांगझाऊ : वृत्तसंस्था
    आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाची विजयी मालिका कायम आहे. ग्रुप स्टेजमध्ये अपराजित राहून भारताने सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. महिला संघाने त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात हाँगकाँगचा १३-० अशा मोठ्या फरकाने पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाकडून सुवर्णपदक जिंकण्याची अपेक्षा आहे.
    हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात, भारतीय स्ट्रायकर वंदना कटारिया, उपकर्णधार दीप ग्रेस एक्का आणि दीपिकाने हॅट्ट्रिक साधली, ज्यामुळे भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला हॉकी स्पर्धेत हाँगकाँगवर १३-० असा विजय मिळवला. शेवटच्या गट सामन्यातील विजयाने भारतीय संघाचे मनोबल अधिक उंचावले आहे.
    वंदना कटारिया मैदानावर आज जबरदस्त फॉर्ममध्ये होती, तिने दुसऱ्या, १६व्या आणि ४८व्या मिनिटाला गोल केले. त्याचप्रमाणे दीप ग्रेसने ११व्या, ३४व्या आणि ४२व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये केले. त्यानंतर दीपिकानेही चौथ्या, ५४व्या आणि ५८व्या मिनिटाला गोल केले. संगीता कुमारी, मोनिका आणि नवनीत कौर यांनीही गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon : महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे मंत्री रक्षाताई खडसे

    March 8, 2026

    India vs England Semi-Final: उपांत्य फेरीत टीम इंडियाचा प्लेइंग 11 निर्णय, बेंचवर बसणार हे चार महत्त्वाचे नाव

    March 5, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.