साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील नगरदेवळा येथील लक्ष्मीबाई पवार वाचनालयाचे ग्रंथपाल संजय जसनसिंग परदेशी यांचे अकस्मात निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियाना आर्थिक मदत मिळावी, त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील ग्रंथालयांना मदतीचा हात द्यावा, असे आव्हान केले होते. ग्रंथालय संघाने ११ हजाराचा मदतनिधी संकलित करुन नगरदेवळा येथे कै. संजय परदेशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन नुकताच देण्यात आला.
यावेळी जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष रवींद्र पाटील, कार्यवाह संजय पाटील, व्यवस्थापक सागर बघुरे, संचालक गणेश देशमुख, पाचोरा तालुकाध्यक्ष यशवंत पाटील, भैय्या पाटील, महेंद्र राजपूत तसेच लक्ष्मीबाई पवार वाचनालयाचे संचालक शिवनारायण जाधव, मिलिंद दुसाने, राकेश थेपडे, माधवराव शिंदे आदी उपस्थित होते.