Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»सात्त्विक-चिराग, श्रीकांतची आगेकूच
    क्रीडा

    सात्त्विक-चिराग, श्रीकांतची आगेकूच

    Kishor KoliBy Kishor KoliOctober 3, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    हांगझोऊ : वृत्तसंस्था
    श्रीकांतने पुरुष एकेरीच्या सामन्यात व्हिएतनामच्या फाट ले डुकला २९ मिनिटे चाललेल्या सामन्यात २१-१०, २१-१० असे पराभूत करत दुसऱ्या फेरीत आगेकूच केली. २०२१च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या श्रीकांतचा सामना पुढच्या फेरीत कोरियाच्या ली युन जियुशी होईल.
    राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सात्त्विकसाईराज व चिराग जोडीने पुरुष दुहेरीत हाँगकाँगच्या चो हिन लोंग व लुइ चुन वेइ जोडीला २१-११, २१-१६ असे सरळ गेममध्ये नमवले.जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या भारतीय जोडीचा सामना आता इंडोनेशियाच्या रोली कार्नाडो व डॅनियल मार्टिनशी होईल.
    मिश्र दुहेरीत साई प्रतीक व तनीषा क्रॅस्टोने मकाऊच्या लियोंग लोग चोंग व वेंग चि एंगला २१-१८,२१-१४ अशा फरकाने पराभूत केले. आता त्यांची गाठ मलेशियाच्या चेन तांग जि व तो ई वेई जोडीशी पडेल. भारताच्या एम आर अर्जुनला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली तर रोहन कपूरला ताप येत आहे. अर्जुन आणि ध्रुव कपिला जोडीला जपानच्या ताकुरो होकी व युगो कोबायाशी जोडीविरुद्ध सामना मध्येच सोडावा लागला. त्यावेळी भारतीय जोडी ३-१३ अशी पिछाडीवर होती. तर, सिक्की रेड्डी व रोहन यांनाही मलेशियाच्या गोह सुन हुआत व शेवोन लाइ जेमीविरुद्ध पहिल्या दोन मिनिटांनंतरच माघार घ्यावी लागली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Sports Sector Is Important : युवकांच्या उज्वल भविष्यासाठी क्रीडा क्षेत्र महत्त्वाचे : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

    December 23, 2025

    Open Chess Tournament : जी. एच. रायसोनी ओपन बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

    December 22, 2025

    Kho-Kho Competition : खो-खो स्पर्धेच्या जिल्हा संघाच्या कर्णधारपदी मोहित गुंजकर, किरण बोदडे

    December 17, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.