कैटेलिन कैरिको आणि डू वीजमैन यांना नोबेल पुरस्कार जाहीर

0
32

नवीदिल्ली : वृत्तसंस्था

जगभरातील प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून नोबेल पारितोषिक समजले जाते.नोबेल पुरस्कारांची घोषणा आजपासून सुरु झाली आहे. कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी एमआरएनए या लसीची निर्मिती करणाऱ्या वैज्ञानिकांना यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.कैटेलिन कैरिको आणि डू वीजमैन यांना शरीर विज्ञान किंवा औषधशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
जेव्हा कोरोनाने जगभरात हात पाय पसरले होते, त्यावर कोणतेही औषधोपचार नव्हता वा इलाज नव्हता. जगभरातला प्रत्येक शास्त्रज्ञ औषधे शोधण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा कोरोनावरील लस शोधण्याचे दिव्य काम कैटिलिन कैरिको आणि डू वीजमैन यांनी केले. या दोन्ही शास्त्रज्ञांनी जेव्हा जग कोरोनाच्या काळात लढत होते त्यावेळी २०२० मध्ये या लशीच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरु केले होते. बायोएनटेक आणि मॉडर्ना यांनी कैटेलिन कैरिको आणि डू वीजमैन या दोघांनी शोध लावलेल्या एमआरएनए या लसीचा वापर केला.
कैटिलिन कैरिको यांचा जन्म १९५५ मध्ये हंगेरीच्या जोलनोकमध्ये झाला होता.त्यांनी १९८२ मध्ये जेगेड विद्यापीठातून पीएच.डी केली. त्यानंतर त्यांनी फिलाडेल्फियामध्ये के टेंपल विद्यापीठात संशोधन पूर्ण केले.पुढे त्या पेन्सिलवेनिया विद्यापीठात सहायक प्राध्यापक बनल्या.२०१३ नंतर कैटलिन कैरिको या बायोएनटेक या औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष बनल्या.
ड्रू वीजमैन यांचा जन्म १९५९ मध्ये मैसाच्यूसेटसमध्ये झाला.त्यांनी १९८७ मध्ये पीएच.डी आणि एमडी पदवी पूर्ण केली.हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये त्यांनी काम केले. १९९७ मध्ये त्यांंनी स्वत:चा संशोधन ग्रुप सुरु केला.सध्या ते पेन इन्स्टिट्यूट आणि आरएनए इनोवेशन्सचे संचालक आहेत.

लस कशी काम करते?
कोरोना विषाणू शरीरात कसा पसरतो? कोणत्या भागावर त्याचा जास्त परिणाम होतो? हे सर्व समजून घेतल्यानंतर दोघांनी एमआरएनए लसीचे सूत्र विकसित केले. यानंतर लसही तयार करण्यात आली. वास्तविक, आपल्या पेशींमध्ये असलेला डीएनए मेसेंजर आरएनए म्हणजेच एमआरएनए मध्ये रूपांतरित झाला. याला इन विट्रो ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. कॅटलिन ९० च्या दशकापासून ही प्रक्रिया विकसित करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here