Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»धरणगाव»धरणगावला ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी
    धरणगाव

    धरणगावला ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 30, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
    शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी मिरवणूक काढून ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी केली. यासाठी भडांगपुरा भागात सर्व मुस्लिम बांधव दुपारी जमा झाले होते. त्यानंतर भडांगपुरा भागातून मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक धरणी चौक, जैन गल्ली, पिल्लू मशीन भागातून परिहार चौक, बेलदार गल्ली, किरण मंदिर, तेली तलावमार्गे पतनगरी भागात मिरवणूक समाप्त झाली. मिरवणूक पिल्लू मशीनजवळ आल्यानंतर धरणगाव बेघर संघर्ष समितीचे प्रमुख ॲड.व्ही.एस.भोलाणे यांनी मिरवणुकीचे प्रमुख सय्यद साहब यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांचा रथ मिरवणुकीत सर्वात पुढे होता. यावेळी धरणगाव मुस्लिम समाजाचे अध्यक्ष इरफान भाई उपस्थित होते.

    परिहार चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे मिरवणुकीतील लोकांसाठी पाण्याची व्यवस्था केली होती. यावेळी उबाठा शिवसेनेचे शहर प्रमुख भागवत चौधरी, संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्यासह शिवसेनेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. मिरवणूक तेली तलावाजवळ आल्यानंतर नवे गावाजवळ शिवसेना शिंदे गटातर्फे ६५ किलो नानखटाईचे वाटप मिरवणुकीतील सर्व मुस्लिम बांधवांना करण्यात आले. तसेच मिरवणुकीमधील सर्व मुस्लिम बांधवांवर फुलांचा वर्षाव केला.

    यशस्वीतेसाठी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख विलास महाजन तसेच नगरपालिकेचे गटप्रमुख पप्पू भावे, संजय चौधरी, बाळू जाधव, माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, युवा नेते वाल्मीक पाटील, हेमंत महाजन, गोविंदा धनगर, सत्यवान पहेलवान कंखरे, पवन महाजन, व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भानुदास विसावे यांनी परिश्रम घेतले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोपडा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, धरणगावचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाले, मिलिंद सोनार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Dharangaon : धरणगाव औद्योगिक वसाहतीतील भंगार गोडाऊन खाक

    February 17, 2026

    Dharangaon : शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश

    January 31, 2026

    Jalgaon : जळगाव जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांग प्रकरण : दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

    January 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.