साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव उर्वरित जिल्हास्तरीय जिल्हा असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय आटापाट्या १४, १७, १९ वर्षाआतील मुलींच्या आट्यापाट्या स्पर्धा येथील छत्रपती क्रीडा संकुलात नुकत्याच उत्साहात पार पडल्या. याप्रसंगी १७ वर्षे आतील मुलींच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात कुरवेल हायस्कूलच्या मुलीच्या संघाने बारी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली संघाचा ५ गुणांनी पराभव करत विभागीय स्तरावर मजल मारली आहे. तसेच १७ वर्षाआतील मुलांच्या संघाने दुसरा क्रमांक पटकाविला. सामन्यांचे उद्घाटन खानापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक हेमंत धांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवा सेवा संचालनयाचे क्रीडा समन्वयक अनिल माकडे, कुरवेल हायस्कूलचे मुख्याध्यापक के.पी. बडगुजर, जे.डी.मोरे, क्रीडा शिक्षक वासुदेव महाजन, देविदास महाजन, आर.एम. पाटील, एस.ए.पाटील आदी उपस्थित होते. विजयी संघाना क्रीडा शिक्षक आर.एम.पाटील, एस.ए. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघासह क्रीडा शिक्षकांचे विद्यालयाचे चेअरमन प्रकाश जाधव, शालेय समिती सदस्य काशिनाथ पाटील, रामचंद्र पाटील, कैलास चौधरी, विनायक चौधरी, मुख्याध्यापक के.पी बडगुजर, पर्यवेक्षक व्ही.एस. पवार यांनी कौतुक केले आहे.