ईद-ए-मिलाद निमित्त मनियार बीरादरी तर्फे ईद शिदोरीचे वाटप

0
61

साईमत जळगाव प्रतिनिधी

ईद ए मिलादुन्नबी निमित्त गुरुवार २८ सप्टेंबर रोजी जिल्हा मुस्लिम मणियार तसेच हिटलर डेनिम संस्थेच्या सहकार्याने शहरात विविध ठिकाणी ईदच्या शिदोरीचे वाटप करण्यात आले. यात जिल्हा सामान्य रुग्णालय, कांताई सभागृह, शिरसोली नाका झोपडपट्टी, गणेश मंडळाचे निर्माल्य जमा करणारे कार्यकर्ते व बंदोबस्त करणारे पोलीस बांधवांना शिदोरीसह पाण्याची बॉटल देण्यात आली.

ईद-ए-मिलादुन्नबी म्हणजे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद (स) यांची जयंती या निमित्त मन्यार बीरादरीने हा स्तुत्य उपक्रम राबविला. अंतिम प्रेषित हे संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी ईश्वराने त्यांना या भूतलावर पाठवले होते व त्यांनी आपले जीवन कसे जगावे हे. जगाला दाखवून दिल्याने त्यांच्या या वाढदिवसाला कोणत्याही प्रकारचे अनाठाई खर्च किंवा उधळपट्टी न करता गरजवंत लोकांना ईदची शिदोरी म्हणजे( गोड भात) चे वाटप कंटेनरच्या माध्यमाने सुमारे १००० कंटेनर यावेळी वाटण्यात आले.

जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांच्या नेतृत्वात हिटलर डेनिम चे नूर खान, नावेद खान, नोबल खान, अमान खान, अबुजर खान, एंजल फूड फाऊंडेशन चे इम्रान खाटीक, साहिल शाह, मोहसीन शाह, रहमान शेख व दानियल अलाउद्दीन, मनियार बिरादरीचे रऊफ टेलर,अख्तर शेख, वसीम शेख, मोहसीन शेख, जुबेर पठाण व मुजाहिद शिकलगर तर उस्मानिया पार्कचे समाजसेवक समीर शेख आदींचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here