धरणगाव रेल्वे स्थानकाच्या परिसरात राष्ट्रीय छात्रसेनेतर्फे स्वच्छता अभियान

0
35

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

शासनाच्या ‘स्वच्छता एक सेवा, एक भारत श्रेष्ठ भारत, स्वच्छ आणि सुंदर भारत’ उपक्रमाचा एक भाग म्हणून १८ महाराष्ट्र बटालियन जळगाव यांच्या आदेशान्वे येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि पी.आर.हायस्कूलमधील एनसीसी कॅडेटस्‌‍ यांनी संयुक्तपणे नुकतेच स्वच्छता अभियान राबविले. अभियानाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.अरुण वळवी यांनी केले. अभियानाअंतर्गत येथील रेल्वे स्थानक परिसर, प्लॅटफॉर्मवर साफसफाई करण्यात आली.

स्वच्छता एक सेवा आहे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विद्यार्थी दशेत प्रत्येकाला स्वच्छतेची जाणीव झाली तर भविष्यात स्वच्छतेची समस्या उद्भवणार नाही. अशा उपक्रमात सहभागी होऊन शासनाची मोहीम यशस्वी करण्यासाठी आणि आपले आरोग्य सदृढ करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन डॉ.ए.डी.वळवी यांनी केले.

यशस्वीतेसाठी चीफ ऑफिसर डी.एस.पाटील यांनी नियोजन केले. तसेच रेल्वे स्थानकाचे अधीक्षक निशिकांत जे.ठाकूर, क्रीडा शिक्षक वाय.ए.पाटील, उमाकांत बोरसे यांनी सहकार्य केले. स्वच्छता अभियानात ज्युनिअर सिनियर डीव्हिजन, विंगचे १०४ कॅडेट सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापक डॉ.आशा शिरसाठ, पर्यवेक्षक कैलास वाघ आदी शिक्षकांनी कौतुक केले. यशस्वीतेसाठी अवंती पिंपळगावकर, वर्षा महाजन, कांचन शिंदे, प्रांजल पाटील, मनीष बन्सी, समीर गायकवाड, सिनिअर अंडर ऑफिसर निलेश पाटील, ज्युनिअर अंडर ऑफिसर राज पाटील, कल्पेश पाटील, रोहित सपकाळे आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here