Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जागतिक रुग्ण सुरक्षा सप्ताहानिमित्‍त जनजागृती
    जळगाव

    जागतिक रुग्ण सुरक्षा सप्ताहानिमित्‍त जनजागृती

    SaimatBy SaimatSeptember 26, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव जळगाव

    जागतिक रूग्ण सुरक्षा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णालयात १७ ते २२ सप्टेंबर पर्यंत संसर्गावरील प्रतिबंधात्मक उपायांवर परिसंवादांतर्गत मंथन करण्यात आले. यात निवासी डॉक्टर यांनी संसर्गापासून रूग्णांची पर्यायाने रूग्णालयाची सुरक्षा या विषयावर पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन केले.

    नॅशनल मेडिकल कौन्सिल दिल्लीच्या गाईडलाईन्सनुसार पाच दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली होती. १८ सप्टेंबर रोजी मॉक ड्रिल फॉर फायर सेफ्टी हा प्रोग्राम फायर सेफ्टीचे प्रशिक्षक व हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ सोबत साजरा करण्यात आला. दि १९ सप्टेंबर रोजी मेडिकेशन सेफ्टीविषयी हॉस्पिटल मध्ये संवादा द्वारे जागृती करण्यात आली. दि २० सप्टेंबर रोजी हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल समितीचे सचिव डॉ.कैलास वाघ यांनी हॅण्ड हायजिन व स्पिल मॅनेजमेंटबद्दल प्रात्याक्षिक देऊन जंतू प्रसार कसा रोखण्यात येईल या बद्दल मार्गदर्शन केले. सप्ताहानिमीत्त २१ सप्टेंबर रोजी मेडिसीन, सर्जरी पेडियाट्रीक, मायक्रोबायोलॉजी विभागातर्फे परिसंवाद घेण्यात आला.

    परिसंवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संसर्गापासून रूग्णांची सुरक्षा आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी माहिती जाणून घेतली. २३ सप्टेंबर रोजी डॉ.शुभांगी घुले यांच्यासह सहकार्‍यांच्या मदतीने अ‍ॅनाटॉमी विभागातर्फे पोस्टर मेकिंग स्पर्धेतून जनजागृती करण्यात आली. जागतिक रूग्ण सुरक्षा सप्ताहानिमीत्त आयोजित कार्यक्रमाच्या सुरूवातीला मायक्रोबॉयोलॉजी विभागाचे विभागप्रमुख डॉ. कैलास वाघ यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून रूग्णालयातील संसर्गावरील प्रतिबंधात्मक उपायांविषयीच्या परिसंवादाचा उद्देश विषद केला. या परिसंवादाला १५० विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ कैलास वाघ व त्यांचे सहकार्‍यांनी पूर्ण ह्या कार्यक्रम ची धुरा सांभाळली असून अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रेमचंद पंडित, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांचे मार्गदर्शन लाभले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Chalisgaon:ऑनलाईन फसवणूक: शेतकऱ्याचे बँक खाते हॅक, ५.५ लाख रुपयांची लंपास

    March 18, 2026

    Bhusawal:खडका चौक परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य

    March 18, 2026

    Pachora:स्टॅम्प पेपर घोटाळा उघड; ५०० रुपयांच्या ‘जादा’ मागणीने वेंडर एसीबीच्या जाळ्यात

    March 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.