साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
जळगाव जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. सुलोचना वाघ यांनी जळगाव जिल्हा महिला काँग्रेसच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी बिलखेडा येथील प्रमिला चंपालाल भदाणे यांची निवड केली आहे. अशा आशयाचे नियुक्तीपत्र त्यांना नुकतेच देण्यात आले. धरणगाव तालुक्यात काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी तालुक्यातील महिलांचे संघटन करण्याचा मनोदय प्रमिला भदाणे यांनी निवडीनंतर व्यक्त केला आहे.
त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पवार, जळगाव जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा.सुलोचना वाघ, धरणगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.व्ही.डी.पाटील, सुरेश भागवत, सी.के.पाटील, सम्राट परिहार, अरुणा कंखरे, वैजयंता भागवत, लता पाटील, चंपालाल भदाणे यांच्यासह धरणगाव तालुक्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कौतुक केले आहे.