स्वीट कॉर्नची शेती करा, चांगला नफा मिळवा

0
26
स्वीट कॉर्नची शेती करा, चांगला नफा मिळवा-saimatlive.com

शेतकरी सातत्याने आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. यामध्यमातून चांगले उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण कधी कधी नैसर्गिक संकटांचा फटका पिकाला बसतो. दरम्यान, शेतकरी स्वीट कॉर्न मकेची लागवड करुन चांगला नफा मिळवू शकतात. हंगाम कोणताही असला तरी स्वीट कॉर्न मकेला मोठी मागणी असते. स्वीट कॉर्न मका देशाबरोबरच परदेशातील लोकांना देखील आवडते. त्यामुळं देशातील शेतकरी या मकेच्या लागवडीतून चांगल उत्पन्न मिळवू शकतात.

स्वीट कॉर्नच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळते

स्वीट कॉर्नची लागवड ही मक्याच्या लागवडीसारखीच आहे. स्वीट कॉर्नच्या लागवडीत मका पक्व होण्याआधीच काढली जाते. त्यामुळं शेतकऱ्यांना लवकरच चांगले उत्पन्न मिळते. स्वीट कॉर्नसह शेतकरी फुलांची लागवड करूनही चांगला नफा मिळवू शकतात. तसेच मसाला पदार्थांचीलागवड करुनही शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात. स्वीट कॉर्न काढणी ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे. स्वीट कॉर्नची काढणी सकाळी किंवा संध्याकाळी करा. यामुळं पीक जास्त काळ ताजे राहते. काढणी पूर्ण झाल्यावर बाजारात विकावे. स्वीट कॉर्न जास्त काळ साठवू नका; त्यामुळं त्याचा गोडवा कमी होईल.

स्वीट कॉर्न मकेची लगवड

जेव्हा तुम्ही स्वीट कॉर्नची लागवड करता तेव्हा फक्त सुधारित जातीची निवड करा. कीटक-प्रतिरोधक वाण कमी वेळेत तयार होते. लावडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करा. निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करा, जेणेकरून पिकात जास्त पाणी साचणार नाही. स्वीट कॉर्नचे उत्पादन संपूर्ण भारतात होत असले तरी सर्वाधिक उत्पादन उत्तर प्रदेशात होते. रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात स्वीट कॉर्न मकेचं उत्पादन घेता येते.

आरोग्याच्या दृष्टीने महत्व

स्वीट कॉर्न मका जेवढे खायला चविष्ट आहे, तेवढेच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. स्वीट कॉर्नमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-ई, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्‌‍स यांसारखे पोषक तत्व आढळतात. स्वीट कॉर्न अनेक आरोग्याच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. स्वीट कॉर्नमुळं अन्न पचन होण्यास मदत होते. तसेच रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. मक्याची पोळी खाण्याने कॉलेस्ट्रॉल कमी होतं आणि यामुळे कार्डियोव्हॅस्क्युलरचा धोकाही कमी होतो.मक्याच्या पीठात बीटा-कॅरटीन नावाचं तत्त्वं आढळते. हे तत्त्व रेड ब्लड सेल्सच्या निर्मितीत मदत करतं. त्यामुळे हे खाल्ल्याने एनिमियाचा त्रास होत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here