साईमत जळगाव प्रतिनीधी
अजिंठा आर्ट सोसायटी जळगाव व नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे (मि.) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांचे चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन धी शेंदुर्णी संस्थेचे सचिव सतिष काशिद यांच्या हस्ते झाले
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून धी शेंदुर्णी संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड , पु्.ना.गाडगीळचे शाखा मॅनेजर संदिप पोतदार, शाळेचे मुख्याध्यापक बी.एस.निकम, पर्यवेक्षक व्ही.आर.पाटील हे उपस्थित होते.
या चित्रप्रदर्शनात पेन्सील माध्यमाचे गणपती चे आकर्षक ड्राईंग व पेंटींग, पोस्टर कलर माध्यमाचे पेंटींग तसेच निसर्गचित्र, वारली पेंटींग अशा विविध माध्यमाची व शैलीची एकुण 60 पेंटींग आहेत. सदर चित्रकला प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य असुन 18 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत उपलब्ध आहे. सदर चित्रप्रदर्शनात नि.प.पाटील विद्यालय, पळासखेडे (मिराचे) यांचे चित्र कलाकृती आहेत.
सतिष काशिद यांनी मनोगत व्यक्त करतांना कलेची जोपासना आणि कलेमध्ये करिअर करा असे सांगितले, तसेच ग्रामीण भागातील चित्रकला प्रदर्शन बघुन त्यांना अतिशय आनंद वाटला. संजय गरुड यांनी चित्रकलेमध्ये विविध शैलीचे चित्राचे कौतुक केले व कलेची जोपासना करावी असे आवर्जुन सांगितले.तसेच कला ही अजरामर असे ते म्हणाले.
चित्रप्रदर्शनात मिताली काळे, गायत्री भुरे , पुनम सुर्यवंशी ,ईश्वर चौधरी, प्रतिक्षा पाटील, जयश्री घोडके , रितु पाटील , रेणू पवार, जान्हवी हडप ,जयश्री पिठोडे, जान्हवी खैरे ,योजना चौधरी व माजी विद्यार्थ्यांचे पेटींग आहेत.
विद्यार्थ्यांना शिवप्रसाद जोशी, डी.आर.चौधरी यांनी मार्गदर्शन केले. श्री.टी.टी.इंगळे सरांनी सुत्रसंचलन केले तर आभार प्रदर्शन मनिष पाटील यांनी मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर वृंद यांचे अनमोल सहकार्य लाभले.