Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»धरणगाव»धरणगावात सत्यशोधक समाज संघाची बैठक उत्साहात
    धरणगाव

    धरणगावात सत्यशोधक समाज संघाची बैठक उत्साहात

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 20, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

    येथील संत सावता माळी समाज पंचमंडळ, मोठा माळीवाडा समाज भवनात सत्यशोधक समाज संघाची अभ्यासगट व चर्चा बैठक नुकतीच घेण्यात आली. अध्यक्षस्थानी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव माळी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सत्यशोधक समाज संघाचे राज्य सचिव डॉ.सुरेश झाल्टे(धुळे), सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक विजय लुल्हे (जळगाव), विधीकर्ते शिवदास महाजन (एरंडोल) आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्यशोधक अधिवेशन पत्रिकांचा शुभारंभ करून सर्वांना पत्रिकांचे वाटप करण्यात आले.

    याप्रसंगी डॉ.सुरेश झाल्टे यांनी सत्यशोधक चळवळीचा इतिहास उलगडला. सत्यशोधक समाज संघाचे महत्त्व सांगून सत्यशोधक विचारांवर चालण्याची गरज आहे. महाराष्ट्रात सत्यशोधक विधीकर्ते निर्माण करून प्रत्येकाने सत्यशोधक विधीप्रमाणे विधी करावेत, असे मनोगतातून आवाहन केले. यावेळी मोठा माळीवाडा, लहान माळीवाडा परिसराचे समाजाध्यक्ष विठोबा माळी, रामकृष्ण महाजन म्हणाले की, आम्ही जास्तीत जास्त संख्येने नाशिक येथे अधिवेशनाला येऊ, असे आश्वासन दिले.

    यांची होती उपस्थिती

    याप्रसंगी उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, निंबाजी महाजन, सचिव गोपाल माळी, पुंडलिक महाजन, कोषाध्यक्ष व्ही.टी.माळी, राजेंद्र महाजन, ज्येष्ठ सदस्य रावा माळी, सुकदेव महाजन, दशरथ महाजन, विजय महाजन, दीपक महाजन, डिगंबर महाजन, पाटील समाज पंच मंडळाचे कोषाध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, राजेंद्र वाघ, नितेश महाजन, कैलास माळी, गोरख देशमुख, रामचंद्र माळी, गोपाल माळी आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक पी.डी.पाटील यांनी येत्या २४ सप्टेंबरला नाशिक येथे राज्यस्तरीय अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन तथा आभार सत्यशोधक समाज संघाचे प्रचारक एच.डी.माळी यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Dharangaon: धरणगाव तालुक्यातील नाले आणि बंधारे सुधारण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम

    March 2, 2026

    Dharangaon : धरणगाव औद्योगिक वसाहतीतील भंगार गोडाऊन खाक

    February 17, 2026

    Dharangaon : शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश

    January 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.