Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»धुळे»सोनगीरकरांना पाणीटंचाईतून दिलासा जामफळ धरणातून तात्पुरती योजना कार्यान्वित
    धुळे

    सोनगीरकरांना पाणीटंचाईतून दिलासा जामफळ धरणातून तात्पुरती योजना कार्यान्वित

    SaimatBy SaimatSeptember 15, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत धुळे प्रतिनिधी

    येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ४६ लाख रुपये खर्चाची जामफळ धरणातून तात्पुरती योजना कार्यान्वित झाली असून, पाणीटंचाईतून ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. पाणीपुरवठा योजनेचे नारळ वाढवून उद्‌घाटन प्रभारी सरपंच सविता पाटील यांनी केले.

    येधे जामफळ धरणातून पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी १७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ती पूर्णत्वास येण्यासाठी तीन ते चार वर्षे लागणार असल्याने तात्पुरती योजना पूर्ण करण्यास आली.सध्या येथे दहा दिवसांआड पाणी मिळते. जामफळ प्रकल्पाच्या कामात दोनपैकी एक जलवाहिनी तोडण्यात आली, तसेच कूपनलिकेचे स्रोत आटल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली. ती टंचाई आजही कायम आहे. मात्र आजपासून तात्पुरत्या योजनेचे पाणी मिळण्यास सुरवात झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.

    योजनेसाठी भाजपचे प्रा. अरविंद जाधव, जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी सहकार्य केले. सरपंच प्रतिनिधी समाधान पाटील, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष आर. के. माळी व ग्रामपंचायत सदस्यांनी मंजुरीसाठी पाठपुरावा केला. सुमारे चार किलोमीटर जलवाहिनी व दोन २५ अश्वशक्तीचे वीजपंप पूर्वीच्याच विहिरीत बसविले आहेत.या वेळी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आर. के. माळी, समाधान पाटील, पंचायत समिती सदस्य चेतन चौधरी, माजी सरपंच केदारेश्वर मोरे, ग्रामपंचायत सदस्य आरिफ खान पठाण, शफियोद्दीन पठाण, मुन्ना शेख, विशाल कासार, लखन ठेलारी, पिंटू भिल, इरफान पठाण, श्याम माळी, राजेंद्र जाधव, धाकू बडगुजर, हाजी अल्ताफ कुरेशी, मोहनसिंग परदेशी, उमेश पाटील, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.गावातील प्रत्येक भागात योग्य दाबाने पाणीपुरवठा व्हावा म्हणून वेगवेगळे ११० हून अधिक टप्पे आहेत. तसेच तीन ते सहा इंच व्यासाच्या जलवाहिन्यांमुळे कितीही पाण्याची उपलब्धता असली तरी किमान सात दिवसांआड पाणी मिळते. या पार्श्‍वभूमीवर जामफळ प्रकल्पाच्या वायव्येकडील चांदगड गावाच्या दिशेला विहीर खोदली जात असून, तेथून जलशुद्धीकरण केंद्र व जलवाहिनीद्वारे गावात पाणीपुरवठा केला जाणार आहे. येथे आता दहा दिवसांऐवजी सात दिवसांआड पाणी मिळणार आहे. गावातील जमिनींतर्गत जलवाहिनी बदलण्यात येणार असून, संपूर्ण गावात दिवसाआड नळाद्वारे पाणी मिळेल अशी व्यवस्था केली जाणार आहे. गावातील जलवाहिनी बदलण्यासाठी आठ कोटी व विहीर व इतर कामासाठी नऊ कोटी रुपये खर्च मंजूर झाला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Taloda:क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तळोदा महाविद्यालयात अभिवादन

    January 3, 2026

    Navapur:“नवापूर नगराध्यक्षांचे दालन नागरिकांसाठी सदैव खुले; नवापूरमध्ये लोकशाही संवादाला नवे बळ”

    January 3, 2026

    Dhule:भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण फुंकणार रविवारी प्रचाराचे रणशिंग

    January 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.