Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»बैलपोळा अन्‌‍ ‘लंपी’ चे संकट
    कृषी

    बैलपोळा अन्‌‍ ‘लंपी’ चे संकट

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 13, 2023Updated:September 13, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. प्राचीन काळापासून शेती व्यवसायावर लोक आपला उदरनिर्वाह करत आहेत. भारतात प्रमुख व्यवसाय म्हणून शेतीकडे पहिले जाते. भारतात ६० टक्क्याच्यावर लोक शेती हा प्रमुख व्यवसाय करतात. भारतात सामाजिक आर्थिक विकासात शेती या प्रमुख व्यवसाय आहे. अशा प्रमुख व्यवसाय असलेल्या भारतात शेतकऱ्याला म्हणजेच बळीराजाला प्रमुख सात असतील त्याच्या पशुधनाची. पशुधनात काय बैल, बकरी, म्हैस यासारखे जनावरे पशुधन म्हणून पाळले जातात. त्यात प्रमुख प्रशासन म्हणून बैल या प्राण्याकडे पाहिले जाते.

    प्राचीन काळापासून शेतकऱ्याला शेती व्यवसायात मदत करत असलेला बैल (सर्जा) हा शेतकऱ्याचा मित्र आहे. सर्जाराजाचा सण भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने साजरा करतात. महाराष्ट्रात आसन ‘बैलपोळा’ नावाने साजरा करतात. बैलपोळा सर्जाराजाचा वाढदिवसच, या दिवशी बैलांना सर्व कामापासून सुट्टी असते. भारतात बैलांच्या खूप जाती पहायवास मिळतात. जसे की नंदी, खिल्लारी, नागोरी, मालवी, निमाडी, पोंवर, डोंगी, ओंगोल, जवरी, गवळव, सिंधी, राठी, गिर, वेचून, देवणी यासारख्या खूप जाती आहेत. यापैकी बऱ्याचशा जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी सारख्या राजाच्या खांद्याला हळद व तुपाने मालिश केली जाते. त्यास खांदे मळणी म्हणतात. बैलपोळ्याच्या दिवशी सकाळी नदी, तलाव, विहीर येथे आंघोळ काढून वेगवेगळे पद्धतीने पहिल्यांदा सजवून त्यांची गावातून मिरवणूक काढली जाते व गोडाचे जेवण भरून बैलांची पूजा केली जाते. यंदाच्या बैलपोळ्याच्या सणावर शेतकऱ्यावर नैसर्गिक संकट तसेच त्याच्या पशुधनावरती ‘लंपी’ आजाराचे संकट ओढावले आहे. आर्थिक संकटामुळे बैलपोळा सण शेतकरी साजरा करू शकत नाही.

    पशुधनावर ‘लंपी’ आजाराचा हल्ला

    जगातील क्रमवारीत भारत देश २ नंबरचा देश आहे. ज्याच्याकडे सर्वात जास्त पशुधन आहे. भारतात २८१ दशलक्ष पशुधन आहे. अशा या पशुधनावर ‘लंपी’ आजाराने हल्ला केला आहे. त्यात आतापर्यंत साठ हजाराच्यावर जनावरे दगावली आहेत. ‘लंपी’ हा त्वचेचा रोग असून हा संसर्गजन्य आजार आहे, हा प्रामुख्याने गुरांमध्ये होतो. ‘लंपी’ हा रोग पॉक्सीव्हीरीडी परिवारातील कॅप्रीपॉक्स व्हायरस आहे. ‘लंपी’ आजार मच्छर, डास, उवा, यांच्या विशिष्ट प्रजाती चावल्यामुळे होतो. हा विषाणू ज्यांना आजार संक्रमित होणारा आहे. एकापासून दुसऱ्या जनावरास होतो. २०१९ मध्ये भारतात प्रथम या आजाराची लागण झाली. त्यामुळे अनेक गुरे दगावली.

    ‘लंपी’ आजाराची लक्षणे

    गुरांना ताप येणे, गुरांचे वजन कमी होणे, डोळ्यातून चिकट पदार्थ बाहेर येणे, तोंडातून लाळ पडणे, शरीरावर गाठी येणे, गुरांचे तब्येत खराब होणे व दगावणे आदी. WOAH (वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थ) यांनी ‘लंपी’ आजाराची लक्षणे तसेच उपाय शेतकऱ्यांना सांगितले आहे.

    शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी

    गुरांच्या गोठ्यात माशाडा सुधारण्याची काळजी घ्यावी व स्वच्छता राखावी, यांचा वडासांचा प्रतिबंधात्मक उपाय करावा, निरोगी गुरांना लंपी बाधित गुरांपासून दूर (वेगळे) ठेवणे, लंपी बाधीत गुरांना चरणासाठी बाहेर सोडू नये, गाई म्हशी वेगवेगळ्या ठिकाणी बांधाव्या, गुरांचा लसीकरण करावे अशी काळजी घ्यायची आहे.

    ‘लंपी’चे सावट दूर होवो

    ‘लंपी’ आजाराने बाधित गावात तसेच गावापासून ५ किलोमीटर त्रिज्येत गावातील ४ महिने वयावरील गाय, म्हैस, बैल जनावरांना १ एम.एल. प्रति ‘गोट पॉक्स उत्तर काशी स्ट्रेन’ लस टोचाव्यात. प्रत्येक गुरांना वेगवेगळी सुई वापरावी, वेळोवेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे, ‘लंपी’ बाधित गुरांचे दूध पिऊ नये. अशा पद्धतीने गावराण न जाता काळजी घ्यावी आपल्या गुरांना बरे करावे. बैलपोळ्याच्या सणावर बळीराजास सुगीचे दिवस येवो, पशुधनावरील ‘लंपी’ आजाराचे सावट लवकर दूर होवो, अशी देवाकडे प्रार्थना करू या…!

    -आकाश रवींद्रनाथ भालेराव
    रा. शेमळदे, ता. मुक्ताईनगर
    मो.नं. ८८०६७८२६१०

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Indefinite Strike Warning : महसूल कर्मचाऱ्यांचा १९ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

    December 17, 2025

    Pune : लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

    December 15, 2025

    Muktainagar : मुक्ताईनगरात मानवाधिकार दिन साजरा

    December 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.