साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
येथे ‘शासन आपल्या दारी’ आयोजित कार्यक्रमात पाचोरा नगरपरिषदेच्या ‘माझी वसुंधरा’ अभियांनांतर्गत पर्यावरणपूरक अश्ाा ३ लाख ५० हजार रकमेच्या २ Hudraulic इलेक्ट्रिक घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना वाहनाची चावी देऊन करण्यात आले. हे वाहन ३ तास चार्जिंग केल्यानंतर १०० कि.मी. चालते. या वाहनाची क्षमता १.५ टन असून वाहनास ४० कि.मी. प्रति तास असा आहे.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खा. उन्मेश पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. जयकुमार रावल, माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, पदाधिकारी तसेच पाचोरा न. पा. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, भडगाव मुख्याधिकारी रवींद्र लांडे आदी उपस्थित होते.