Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पाचोरा»बदली झालेले अन्‌‍ नवीन रुजू झालेल्या शिक्षकांचा स्वागत समारंभ
    पाचोरा

    बदली झालेले अन्‌‍ नवीन रुजू झालेल्या शिक्षकांचा स्वागत समारंभ

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

    शाळा व्यवस्थापन समिती आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसास यांच्यातर्फे म्हसास शाळेचे आदर्श माजी मुख्याध्यापक रत्नाकर पाटील आणि उपशिक्षक प्रवीण भालेराव यांची ऑनलाईन संगणकीय बदली झाल्याने त्यांना शाळेतर्फे निरोप देण्यात आला.
    कार्यक्रमासाठी म्हसास, रामेश्वर गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य तसेच दोन्ही गावातील शिक्षण प्रेमी, लोहारा केंद्र अंतर्गत सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रम यशस्वी झाला. अध्यक्षस्थानी म्हसासचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील होते. याप्रसंगी प्राजक्ता जळतकर, महेश रोकडे, शिवाजी बोरसे या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केली. विद्यार्थी व गावातील शिक्षणप्रेमी यांनीही मनोगत व्यक्त केले.

    शाळेतर्फे रत्नाकर पाटील, प्रवीण भालेराव यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ऑनलाईन संगणकीय बदलीने म्हसास शाळेत नुकतेच रुजू झालेले ज्ञानेश्वर जाधव, पंकज पालीवाल यांचाही शाळेसह मान्यवरांतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी रत्नाकर पाटील, प्रवीण भालेराव यांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तथा मुख्याध्यापक, सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक म्हसास शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर जाधव, सूत्रसंचालन पालीवाल तर आभार शिवाजी बोरसे यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora : तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याला पाचोरात रंगेहात अटक

    February 19, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.