Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»‘एक गाव, एक गणपती’ उत्सव साजरा करण्याचे आवाहन !
    जळगाव

    ‘एक गाव, एक गणपती’ उत्सव साजरा करण्याचे आवाहन !

    SaimatBy SaimatSeptember 6, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर पोहोचला असून संपूर्ण तालुक्यात या उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. या संपूर्ण गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह शांततामय वातावरणात उत्सव साजरा होणे आवश्यक आहे. यामुळेच जळगाव तालुक्यात सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्व नागरिक, गणेश मंडळ, सरपंच, शहरातील नगरसेवक व विविध संस्था, सर्व पदाधिकारी यांनी ‌‘एक गाव, एक गणपती‌’ तसेच शहरात ‘एक वार्ड, एक गणपती’ साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा व प्रशासनास मदत करावी, असे आवाहन जळगाव तालुका युवासेनेच्या वतीने उपतालुका प्रमुख स्वप्निल सोनवणे यांनी केले आहे.

    राज्यात दरवर्षीप्रमाणे १९ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा होणार आहे. ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेस विरोध करणेसाठी जनतेची एकजुट साधण्याकरीता व सामाजिक ऐक्य व सलोखा वृध्दींगत करणेकरीता लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी करणेस सुरूवात केली. मात्र वर्तमानात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मुळ उद्देशाचा विसर नागरिकांना पडत चालल्याचे दिसून येत आहे. गल्लोगल्ली स्थापन झालेली गणेश मंडळांच्या माध्यमातून बऱ्याचदा राजकीय व सामाजिक तेढ निर्माण झाल्याच्या घटना घडत असतात.

    सार्वजनिक स्वरूपात साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवात मंडळांनी विदयार्थ्यांसाठी स्पर्धा, महिलांसाठीचे उपक्रम, आरोग्य तपासणी, सांस्कृतीक कार्यक्रम इ. रचनात्मक कामांचे आयोजन करावे व उत्सवास बिभित्सपणा आणणारे फ्लेक्स, पोस्टर्स लावण्यास फाटा देण्यात यावा व शांततामय मार्गाने सदर उत्सव साजरा करून जिल्हा प्रशासनास मदत करावी, अशी साद जळगाव तालुका युवासेनेतर्फे संपूर्ण तालुकावासीयांना घालण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Chop : अनेर नदीत धाडसी उडी ओम पाटीलने वाचवले चौघांचे प्राण

    March 24, 2026

    Jalgaon : जळगावात अतिक्रमणाविरोधात महापालिकेची जबरदस्त कारवाई

    March 23, 2026

    Erandol : एरंडोल परिसरात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात चालक फरार

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.