Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य भोवले
    राजकीय

    सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य भोवले

    saimatBy saimatSeptember 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रामपूर ः

    तमिळनाडूचे क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा तसेच अभिनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून देशभरातून गदारोळ झाला होता. आता उदयनिधी स्टॅलिन आणि प्रियांक खरगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

    शनिवारी (२ सप्टेंबर) उदयनिधी स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमात बोलताना सनातन धर्माचं उच्चाटन करण्याची भूमिका मांडली होती. “सनातन धर्म हा समानता व सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं उच्चाटन केलं जायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध केला जाऊ शकत नाही. त्यांचे उच्चाटनच केले जायला हवं. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही व्हायला हवं”, असे विधान उदयनिधी यांनी चेन्नईत एका कार्यक्रमात केलं. तर, उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचे मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपूत्र प्रियांक खरगे यांनी समर्थन केले होते.

    याप्रकरणी उदयनिधी आणि प्रियांक खरगे यांच्याविरोधात वकील हर्ष गुप्ता आणि रामसिंग लोधी यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरून दोघांवर मंगळवारी उत्तर प्रदेशातील रामपूर येथील सिव्हिल लायन्स पोलिस ठाण्यामध्ये आयपीसीच्या कलम २९५ ए (धार्मिक भावना भडकवण्यासाठी हेतुपुरस्सर आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये) आणि १५३ ए (विविध धार्मिक गटांमधील वैर वाढवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026

    राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा ठरला उमेदवार; काँग्रेसने शरद पवारांना दिला पाठिंबा

    March 4, 2026

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.