साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
लोकशाही मार्गाने संविधानिक आरक्षणाची मागणी करणारे, जालन्यातील मराठा बहुजनांवर दडपशाही शासनकर्त्यांनी केलेल्या लाठी हल्ल्याचा जाहीर निषेधाकरीता पाचोरा तहसील कार्यालयासमोर समस्त मराठा बहुजन समाज व सामाजिक संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन केले. या ठिकाणी वैशाली सूर्यवंशी यांनी समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत उपस्थिती नोंदवून हल्ल्याचा निषेध जाहीर केला. यापूर्वी २ सप्टेंबर रोजी त्यांनी समस्त कार्यकर्त्यांसोबत तहसीलदार यांच्याकडे हल्ल्याचा निषेध म्हणून निवेदन देऊन निषेध व्यक्त केला होता. समस्त मराठा बांधवांसोबत उपस्थित राहून अमानुष हल्ल्याचा निषेध केला.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, नरेंद्रसिंग सूर्यवंशी, शहर प्रमुख अनिल सावंत, पप्पू राजपूत, राजेंद्र राणा, दादाभाऊ चौधरी, उपजिल्हा संघटिका तिलात्तमा मौर्य, मंदाकिनी पारोचे, आनंद सांगवी, पप्पू जाधव, मिलिंद पटवारी, युवा सेना शहर प्रमुख मनोज चौधरी, भरत खंडेलवाल, अभिषेक खंडेलवाल, बापू वाणी, जे.के.पाटील, रतन परदेशी, सुधाकर महाजन, संजय चौधरी, खंडू सोनवणे, निखिल सोनवणे, आनंद पारोचे, कैलास चौधरी, प्रवीण पाटील, नाना चौधरी, नाना वाघ, संतोष पाटील सर, ॲड. किशोर पाटील, धरमसिंग पाटील, राजू गायकवाड, गोकुल गांगुर्डे, दिलीप कासार, प्रवीण वाघ, मयूर मोरे, गौरव पाटील, शुभम राजपूत यांच्यासह समस्त पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक, शिवभक्त उपस्थित होते.