राष्ट्रवादी-अजित पवार गटाचे वासुदेव पवार काँग्रेसमध्ये

0
52

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर

जळगाव जिल्ह्यात सध्या काँग्रेसची ‘जनसंवाद’ यात्रा सुरू आहे. ही जनसंवाद यात्रा धरणगाव येथे सोमवारी आल्यावर यात्रेचे धरणगाव तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने भव्य स्वागत करण्यात आले. यात्रेत जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार, माजी अध्यक्ष ॲड. संदीप भैया पाटील, प्रा.डी.डी.पाटील, नाजिम खान, विजू अण्णा महाजन, डॉ.फराज बोहरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. धरणगाव शहरात मुख्य रस्त्यावरून रॅली काढल्यानंतर काँग्रेस कार्यालयात चांदसरचे माजी सरपंच, एरंडोल शेतकी संघाचे माजी अध्यक्ष, चांदसर पिक संरक्षण सोसायटीचे विद्यमान चेअरमन तसेच श्रीराम मंदिर संस्थेचे अध्यक्ष अरुण बापू उर्फ वासुदेव पवार यांनी बाळासाहेब प्रदीप पवार व संदीप भैया पाटील यांच्या हस्ते काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पक्ष मजबूत होण्यास मदत मिळणार

धरणगाव तालुक्यातील चांदसर, चोरगाव, रेल, लाडली, कवठळ भागात वासुदेव पवार यांच्या काँग्रेस प्रवेशाने काँग्रेस पक्ष मजबूत होण्यास मदत मिळणार असल्याचे धरणगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.व्ही.डी.पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी अनेक मान्यवरांसह धरणगाव शहर व तालुक्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. धरणगाव तालुक्यातील बांभोरी बुद्रुक येथेही काँग्रेस जनसंवाद यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here