Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»भारत आणि नेपाळ सामन्यावरही पावसाचे सावट
    क्रीडा

    भारत आणि नेपाळ सामन्यावरही पावसाचे सावट

    Kishor KoliBy Kishor KoliSeptember 3, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पल्लिकल : वृत्तसंस्था

    भारताचा पाकिस्तानबरोबरचा सामना पावसामुळे रद्द झाला. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत आणि तिथे पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे जसा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाऊस पडला तसा जर भारत आणि नेपाळ सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होऊ शकते,याचे समीकरण आता समोर आले आहे.
    भारत आणि पाकिस्तानचा सामना पावसामुळे रद्द झाला त्यामुळे दोन्ही संघांना समान गुण दिले पण पाकिस्तानचा मात्र चांगलाच फायदा झाला कारण पाकिस्तानचा संघ आता सुपर – ४ मध्ये पोहोचला आहे. पण भारत मात्र अजून सुपर – ४ मध्ये पोहोचू शकलेला नाही पण आता जर नेपाळबरोबरचा सामना पण पावसामुळे रद्द झाला तर नेमकं काय होणार, हा प्रश्न भारतीय चाहत्यांना सतावत असेल.
    जर आता नेपाळने भारताचा पराभव केला तर आशिया चषकात मोठा फेरबदल होऊ शकतो. कारण त्यामुळे भारताचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. पण जर या सामन्यात पाऊस पडला तर मात्र दोन्ही संघांना समान १ गुण मिळेल. सध्याच्या घडीला भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे कारण त्यांच्या खात्यात एक गुण आहे. दुसरीकडे नेपाळचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांच्या नावावर एकही गुण नाही.त्यामुळे हा सामना जर पावसामुळे रद्द झाला तर भारताचे दोन आणि नेपाळचे १ गुण होईल. यानुसार भारताचा संघ हा सुपर – ४ मध्ये दाखल होऊ शकतो.
    पावसाच्या लपंडावात झालेल्या आशिया कप वनडे क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी शनिवारी नांगी टाकली. भारतीय फलंदाजांचा कायमची डोकेदुखी असलेला शाहीन शाह आफ्रिदी आणि हारीस रौफ या डावऱ्या-उजव्या वेगवान गोलंदाजांनी भारताची ४ बाद ६६ अशी अवस्था केली. मात्र, ईशान किशन आणि हार्दिक पंड्याने पाचव्या विकेटसाठी १३८ धावा जोडल्यामुळे भारतास २६६ धावांची मजल मारता आली.
    भारतीय फलंदाजांच्या अपयशाने तसेच शाहीनच्या भेदकतेने सुरू झालेल्या या रंगतदार लढतीतील दुसऱ्या डावावर पावसाने पाणी फिरवले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon : महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे मंत्री रक्षाताई खडसे

    March 8, 2026

    India vs England Semi-Final: उपांत्य फेरीत टीम इंडियाचा प्लेइंग 11 निर्णय, बेंचवर बसणार हे चार महत्त्वाचे नाव

    March 5, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.