साईमत जळगाव प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल पूर्व प्राथमिक विभागात शनिवार दि .२सप्टेंबर रोजी नर्सरी ची सहल भाऊंचे उद्यान व ज्युनिअर व सीनिअर केजी ची सहल कुसुंबा येथील गो शाळेत आयोजित करण्यात आली.
गोशाळा तील सहलीत विद्यार्थ्यांना सुरुवातीस गो शाळेमधील कबूतर खाना, वेगवेगळ्या जातीच्या गाई दाखवण्यात आल्या . गाई- म्हशीच्या दुधापासून दही, ताक,लोणी,तूप कसे बनते याची माहिती देण्यात आली. याठिकाणी उंट देखील बघावयास मिळाल्याने विद्यार्थी खुश झाले. परिसर भटकंती झाल्यानंतर विद्यार्थी निसर्गरम्य परिसरात मनसोक्त खेळले.
नर्सरीच्या सहलीत”भाऊंचे उद्यान” येथे सुरवातीला विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रथम उद्यानातील निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हटली. विद्यार्थ्यांना उद्यानातील म्युझियम दाखवून त्याची माहिती सांगण्यात आली. उद्यानातील वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्याचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. या सहलीसाठी सर्व शिक्षक , वाहनचालक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.