साईमत, जळगाव : प्रतिनिधी
येथील जळगाव जिल्हा साहित्य विकास मंडळातर्फे मंगळवारी, ५ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २.०० वाजता शिक्षक दिनानिमित्त डॉ.शामा प्रसाद मुखर्जी उद्यान येथे आजी-माजी शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रा.गोविंदराव पाटील, प्रा. प्रकाश महाजन, प्रा. किरण पाटील, प्रा. विजय लुल्हे. प्रा. प्रकाश पाटील, प्रा. विरेंद्र पाटील, प्रा. अरुण वांद्रे, प्रा.भास्करराव चव्हाण यांची उपस्थिती लाभणार आहे. सर्व शिक्षकांचा सत्कार जळगाव साहित्य विकास मंडळाचे संस्थापक तथा ज्येष्ठ कवी गोविंदराव देवरे यांच्या हस्ते करण्यात येईल.
कार्यक्रमाला इंदिरा जाधव, संतोष साळवे, वैशाली तायडे, मंदा मोरे, पुष्पलता कोळी, एन.के. कोळी, कड्डु बाभुळकर, घनश्याम भुते, सुकदेव वाघ, गोपी कोळी, उ.का. वाणी, प्रवीण महाजन, प्रवीण लोहार, डॉ.ज्ञानेश्वर तोरनाळे, डी.एफ. पाटील, राहुल तायडे, अजय तायडे आदी उपस्थित राहणार आहेत.