केकतनिंभोरातील स्कूलमध्ये रक्षाबंधन दिन साजरा

0
24

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील केकतनिंभोरा येथील दिनकर महाराज बहुउद्देशीय संस्था संचलित ओशन इंटरनॅशनल स्कूल (आयसीएसई पॅटर्न) येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी वायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ओशन इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून व औक्षण करून आनंद द्विगुणित केला. शेवटी मुख्याध्यापिका जयश्री सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ओशन इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here