Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»कर्नाटकात महिलांना ‘गृहलक्ष्मी’ योजनेतून दोन हजार रुपयांची मदत
    राजकीय

    कर्नाटकात महिलांना ‘गृहलक्ष्मी’ योजनेतून दोन हजार रुपयांची मदत

    saimatBy saimatAugust 31, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मैसुरू :

    निवडणूक जाहीरनाम्यातील आणखी एका आश्वासनाची पूर्तता करताना कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने बुधवारी ‘गृहलक्ष्मी’ योजना सुरू केली. यानुसार राज्यातील सुमारे १.१ कोटी महिलांना दर महिन्याला २ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

    काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत महाराजा महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात ‘गृहलक्ष्मी’ची सुरुवात करण्यात आली. काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिलेल्या पाच प्रमुख हमी योजनांपैकी ही एक आहे. काँग्रेसने मे महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करून राज्यात सत्ता स्थापन केली. सिद्धरामय्या यांनी सांगिले की, काँग्रेस सरकारने पाच हमी योजनांपैकी शक्ती, गृहज्योती आणि अन्न भाग्य या तीन योजना याआधीच सुरू केल्या आहेत. ‘गृहलक्ष्मी’ ही चौथी योजना आहे.

    कर्नाटकमधील कामाची देशभरात पुनरावृत्ती- राहुल गांधी

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या प्रमुख आश्वासनांची काँग्रेसने पूर्तता केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारने केलेल्या कामांची आता देशात पुनरावृत्ती करण्यात येईल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले. आम्ही आमच्या आश्वासनांवर ठाम आहोत. आम्ही कधीही खोटे आश्वासन देत नाही, असेही ते म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026

    राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा ठरला उमेदवार; काँग्रेसने शरद पवारांना दिला पाठिंबा

    March 4, 2026

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.