Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»दोन युद्ध लढले, वय वर्ष ९१ तरीही आजोबांनी बायको, लेकीला संपवले, आता जामीनावर सुटका
    क्राईम

    दोन युद्ध लढले, वय वर्ष ९१ तरीही आजोबांनी बायको, लेकीला संपवले, आता जामीनावर सुटका

    saimatBy saimatAugust 31, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई:

    पत्नी आणि मुलीची हत्या करणाऱ्या ९१ वर्षीय वृद्धाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अंथरुणाला खिळलेली पत्नी आणि गतीमंद मुलीचा खून करणाऱ्या वृद्धाला १८ महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. पुरुषोत्तम सिंह गंधोक असे आरोपीचे नाव असून तो अंधेरीच्या शेर-ए-पंजाबमध्ये वास्तव्यास होता. गेल्या फेब्रुवारीत त्यानं ८१ वर्षीय पत्नी आणि ५५ वर्षीय मुलीची हत्या केली.

    दोघींची काळजी घेण्यास मी असमर्थ होतो. त्यामुळे मी त्या दोघींची हत्या केली, असे पुरुषोत्तम सिंह गंधोकनं पोलिसांना सांगितले. गेल्या वर्षीच्या ८ ऑगस्टला दिंडोशी सत्र न्यायालयाने गंधोकता जामीन अर्ज फेटाळला. ‘पत्नी गेल्या १० वर्षांपासून अंथरुणाला खिळून होती. तिला हृदयरोग होता आणि तिची अँजियोप्लास्टी झाली होती. तर मुलगी कमलजीत स्वमग्नतेचा आजार होता. लहानपणापासूनच तिला हा आजार असल्याने ती देखील माझ्यावर अवलंबून होती. तिचे वय ५५ वर्ष असले तरी तिची वर्तणूक लहान मुलांसारखीच होती. दैनंदिन कामे करण्यासाठी ती माझ्यावरच अवलंबून होती. अगदी नैसर्गिक विधी करतानाही तिला माझी मदत लागायची, अशा शब्दांत गंधोकनं स्वत:ची व्यथा मांडली आणि जामिनासाठी अर्ज केला.

    एफआयआरमधील माहितीनुसार, ७ फेब्रुवारी २०२२ च्या सकाळी गंधोकनं त्याच्या विवाहित लेकीला (गुरविंदर) फोन केला. काल रात्री मी पत्नी जसबीर आणि मुलगी कमलजीत यांची हत्या केली. कारण मला त्यांचा त्रास सहन होत नव्हता. दोघी माझ्यावरच अलवंबून होत्या आणि त्यांची काळजी घेणं मला शक्य नव्हते, असे गंधोकनं गुरुविंदरला फोनवर सांगितले. त्यानंतर ती तातडीने गंधोकच्या घरी पोहोचली. गंधोकनंच तिला पोलिसांना बोलवायला सांगितले. पोलीस गंधोकच्या फ्लॅटवर पोहोचले, तेव्हा तिथे गंधोकची पत्नी आणि मुलगी मृतावस्थेत होत्या.

    गंधोकला ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्याची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली. वय नव्वदच्या पुढे असल्यानं गंधोकला स्लिप डिक्स, स्पॉडेलायसिस, गुडघेदुखी, अंगदुखी असे त्रास जाणवत होते. त्यामुळे त्याच्या लेकीनं कोर्टात धाव घेतली. गंधोकचे वकील एस. एस. दुबे आणि पंकज मिश्रा यांनी त्याची बाजू कोर्टात मांडली. गंधोक निवृत्त जवान आहेत. त्यांनी १९६२ मध्ये चीनविरुद्ध आणि १९६५ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात संघर्ष केला आहे. त्यांच्या शरीरावर गोळी लागल्याच्या खुणादेखील आहेत. गुरविंदर तिच्या वडिलांची पूर्ण काळजी घेईल. कोर्टाने दिलेल्या सूचनांचे पालन करेल. पण त्यांना तुरुंगात मृत्यू येता कामा नये, असा युक्तिवाद गंधोकच्या वकिलांनी केला. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने त्याला जामीन दिला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora : पाचोर्‍यात वॉटर हिटरचा शॉक फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

    March 11, 2026

    Railways : एलपीजी टंचाईने रेल्वे खानपान सेवा धास्तावली

    March 11, 2026

    Jalgaon: जळगावात वडिलांच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी घरकुल चौकात गोळीबार

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.