आयसीएमआर प्रोजेक्टसाठी वरुणराज नन्नवरेची निवड!

0
13

साईमत, प्रतिनिधी, जळगाव

 भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद ही भारतामध्ये वैद्यकशास्त्रातील संशोधन आणि सहयोगाला उत्तेजन देणारी भारत सरकारची संस्था आहे. दरवर्षी 1500 वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शॉर्ट टर्म स्टुडंटशिप कार्यक्रम अंतर्गत संशोधन करण्याची संधी मिळते. या वर्षी ती संधी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या व महाविद्यालयाचा जनरल सेक्रेटरी असलेला वरुणराज नन्नवरे याला मिळाली आहे.

यासाठी वरुणराजला फारमॅकोलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. राहुल भावसार यांचे मार्गदर्शन लाभले. सुमारे 20 हजार प्रपोजलमधून केवळ 1 हजार एमबीबीएस विद्यार्थ्यांचे प्रपोजल निवडले जातात. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, हृदयरोगतज्ञ डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस.आर्वीकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांच्यासह सर्व प्राध्यापकांकडून वरुणराजचे अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here