साईमत, प्रतिनिधी, जळगाव
येथील के.सी. ई.सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय-मू जे.(स्वायत्त) महाविद्यालय येथे शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राध्यापक प्रबोधिनीची सालाबादप्रमाणे स्थापना होऊन त्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांनी उद्घाटनपर भाषणात प्राध्यापक प्रबोधिनी म्हणजे शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपीठ आहे.
अध्यापन करत असताना आनंददायी शिक्षण देत विद्यार्थांना सतत प्रोत्साहन देत असताना काय शिकायचे हे न सांगता कसे शिकायचे हे आपल्या अध्यापन कार्यातून विषद करणे अधिक महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक प्रबोधिनी समिती प्रमुख प्रा.मीनल पाटील, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.श्रद्धा पाटील यांनी केले.
याप्रसंगी सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.शीतल काळे,प्रा.लीना भारंबे,प्रा.अर्जुन मेटे,प्रा.राजेश साळुंखे, प्रा.उमेश ठाकरे,प्रा. एकता कवटे, प्रा.माधुरी पाटील यांनी परिश्रम घेतले.