पाळधीला तालुका शासकीय कबड्डी स्पर्धा उत्साहात

0
10

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन जीपीएस कॅम्पसचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. पहिल्या दिवशी १४ वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या व १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या स्पर्धा पार पडल्या. दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून १७ वर्षं वयोगटाच्या स्पर्धेचे उद्घाटन जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण करून करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सचे अध्यक्ष धनराज कासट, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी. कंखरे, इंग्लिश मीडियमचे प्राचार्य सचिन पाटील, वरिष्ठ मा.वि.चे प्राचार्य यु के फासे, कनिष्ठ मा. वि.चे प्राचार्य सुनील खंडागळे, वरिष्ठ शिक्षक एस.एन.चौधरी, डी.एस.पाटील उपस्थित होते.
स्पर्धेच्या नियमांविषयी डी.एन.पाटील यांनी माहिती दिली. स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात गुड शेपर्ड विद्यालयाच्या मुलांचा संघ तर पथराळ विद्यालयाच्या मुलींचा संघ विजयी झाले. १७ वर्ष वयोगटात मुलांचा जी.पी.एस हायस्कूल, पाळधी तर मुलींचा बी.जे. विद्यालय, अनोरे विद्यार्थ्यांचा संघ विजयी झाले. १९ वर्ष वयोगटात ए.सी.ए. कॉलेजने बाजी मारली.

यांनी घेतले परिश्रम

संपूर्ण स्पर्धा तालुका क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. स्पर्धेत पंच म्हणून एम.डी.परदेशी, डी.एन.पाटील, राकेश धनगर, अमोल सोनार, ए.ए.पाटील, श्री.आहेरे, राजेश पावरा यांनी काम पाहिले. गुणलेखक म्हणून श्री.कायंदे, जितेंद्र ओस्तवाल, आर.बी.महाले, हेमंत माळी, वाय.ए.पाटील, ए.एम.जयकारे, श्री.बोरसे, डी.एस.पाटील, शुभम भोई यांनी काम पाहिले. स्पर्धेत १४, १७ व १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींनी सहभाग नोंदविला यशस्वीतेसाठी तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले. तसेच बळीराम भाऊ यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी, सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक एम.डी.परदेशी तर जी.पी.एस.चे क्रीडा शिक्षक राकेश धनगर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here