सुरक्षा अनामतच्या फायलींना कामांची छायाचित्रे आवश्‍यक 

0
12

नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत लघुपाटबंधारे विभागाने बंधाऱ्यांच्या कामांच्या सुरक्षा अनामत रकमेच्या सादर केलेल्या 110 फायलींना पूर्ण झालेल्या कामांची छायाचित्रे नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी नामंजूर केल्या.याशिवाय सुरक्षा अनामत रकमेच्या फायलींना कामांचे फोटो सक्तीचे करण्याचा निर्णय बैठकीत झाला. या निर्णयामुळे ठेकेदारांवर वचक राहणार आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम, लघुपाटबंधारे विभागांतर्गत कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदार कामांची सुरक्षा अनामत रक्कम काढून घेतात.मात्र, अनेकदा कामांच्या तक्रारी असतात, कामे पूर्ण न करता ठेकेदार अनामत रक्कम काढण्याच्या मागे लागतात, असे प्रकार सरार्सपणे होत आहेत. यावर आता अकुंश येणार आहे.श्रीमती मित्तल यांनी सुरक्षा अनामत रक्कम काढण्याबाबत सादर होणाऱ्या फायलींना झालेल्या कामांचे फोटो सक्तीचे केले आहेत. सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वाधिक विषय सुरक्षा अनामत रक्कम काढण्याचे होते.यातही लघुपाटबंधारे विभागाने तब्बल 110 हून अधिक फायली या बंधाऱ्यांच्या झालेल्या कामांची सुरक्षा अनामत रक्कम काढण्याबाबतच्या होत्या. हा विषय चर्चेला आला असता, एकाही फायलीला पूर्ण झालेल्या कामांचे फोटो लावण्यात आलेले नव्हते.त्यावर, श्रीमती मित्तल यांनी नाराजी व्यक्त केली. फायली सादर होताना त्यास फोटो सक्तीचा आहे, तो नसल्यास त्या फायली नामंजूर करण्यात येतील, असे श्रीमती मित्तल यांनी स्पष्ट केले.सभेच्या निमित्ताने घाईघाईत विभागांकडून फायली मंजुरीसाठी दाखल केल्या जातात. यात अनेकदा अपूर्णता असते. त्यामुळे यापुढे परिपूर्ण प्रस्ताव असलेल्या फायली सादर करण्यात याव्यात, अशा सूचना श्रीमती मित्तल यांनी सभेत अधिकाऱ्यांना केल्या.सदर विषय विभागांनी सामान्य प्रशासन विभागास सादर करून, या विभागाने परिपूर्ण प्रस्ताव आहे की नाही, याची तपासणी करावी, अशा सूचनादेखील त्यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here