स्क्रिझोफेनियाच्या 38 वर्षीय रुग्णावर यशस्वी उपचार

0
40

साईमत, प्रतिनिधी, जळगाव

मानसिक आजाराच्या विळख्यात सन 2004 पासून अडकलेल्या 38 वर्षीय रुग्णाची प्रकृती आता हाताबाहेर जात होती. तेवढ्यात त्यांना डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयाच्या माध्यमातून आशेचा किरण दिसला. पाच लोकांनी धरुन त्याला रुग्णालयात दाखल केले असता मानसोपचार तज्ज्ञांनीदेखील सावधगिरी बाळगून खात्रीशीर उपचार केले आणि अवघ्या 24 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर तो रुग्ण नॉर्मल झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील एक महिन्यापूर्वी एका 38 वर्षीय रुग्णाला डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयातील मानसोपचार विभागात आणण्यात आले. येथील मानसोपचार तज्ज्ञांनी रुग्णाशी संवाद साधला. यात रुग्णाला विनाकारण भीती वाटायची, संशय येत असे, कानात वेगवेगळे आवाज येत असत. तसेच तो शिवीगाळही करायचा. एके दिवशी तर रस्त्याने जाणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीच्या मागे कुऱ्हाड घेऊन तो गेला आणि थोडक्यात ती व्यक्ती बचावल्याची ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात देखील भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते.

येथील मानसोपचार तज्ज्ञांनी रुग्णाची हिस्ट्री जाणून घेत सदर रुग्णाला स्क्रिझोफेनिया आजार असल्याचे निदान केले. लगेचच उपचारही सुरू केले. सुरुवातीला त्याच्या हालचालींमुळे डॉक्टरांना देखील खूप सावध राहावे लागत होते. ईसीटी थेरपीमुळे त्याच्यात बदल होत असल्याचे नातेवाईकांना देखील जाणवू लागले. 24 दिवसांच्या वैद्यकीय उपचाराने सदर रुग्ण आता पूर्णत: ठणठणीत झाला आहे.

डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयात मानसोपचार विभाग स्वतंत्र असून येथे मानसोपचार तज्ज्ञ डॉ.मयूर मुठे, डॉ.विलास चव्हाण यांच्यासारखे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. सोबतच निवासी डॉ.आदित्य, डॉ.हुमेद, डॉ.सौरभ, डॉ.विकास, समुपदेशक बबन ठाकरे हे देखील रुग्णांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असतात. येथील मानसोपचार विभागात सर्वच मानसिक आजारांवर उपचार केले जात असून रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here