Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»तांबापूर परिसरातील वृध्द महिलेचे बंद घर फोडून मुद्देमाल लांबवणारा संशयित अटकेत
    क्राईम

    तांबापूर परिसरातील वृध्द महिलेचे बंद घर फोडून मुद्देमाल लांबवणारा संशयित अटकेत

    SaimatBy SaimatAugust 28, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, प्रतिनिधी, जळगाव

    शहरातील तांबापूर परिसरातील वृध्द महिलेचे बंद घर फोडून सोन्याचे व चांदीचे दागिने लांबविल्याची घटना घडली होती. या दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी सुरत येथून अटक करून 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच त्याचे दोन साथीदार व एक अल्पवयीन मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    शहरातील तांबापूर परिसरातील तस्लीमबी मोहम्मद सैय्यद (वय60) ही वृद्ध महिला बकरी ईदच्या निमित्ताने 26 जून ते 7 जुलैदरम्यान धुळे येथे मुलीकडे घराला कुलूप लावून गेल्या होत्या. त्यावेळी त्याचे घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण 48 हजारांचा मु्‌‍द्देमाल लांबवला होता. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, ही घरफोडी रेकॉर्डवरील गुन्हेगार इश्तियाक अली राजीक अली याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी संयशित इश्तियाक अली राजीक अली याला सुरत येथून अटक केली. त्याने हसीनाबी राजी अली (वय 55) रा. तांबापुरा, अनिस हमीद शेख (वय 31) आणि अल्पवयीन मुलाच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.

    यावेळी इतर साथीदारांना देखील ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपीकडून 20 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दीपक जगदाळे, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पो.ना. सचिन पाटील, पोकॉ मुकेश पाटील, अल्ताफ पठाण, मुकेश पाटील, योगेश बारी, छगन तायडे यांच्यासह आदींनी कारवाई केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Shendurni : शेंदुर्णीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य लोकार्पण

    March 15, 2026

    Faizpur : फैजपूर शहरात मुक्ताई पालखी सोहळा

    March 15, 2026

    Bhusawal : पाडळसे शिवमहापुराण कथास्थळावर प्रशासनाचे आदेश दुर्लक्षित

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.