फैजपूरला जे.टी.महाजन कॉलेज ऑफ इंजिनियरिंगला ‘इंडक्शन प्रोग्राम’

0
24

फैजपूर : प्रतिनिधी

येथील जे.टी.महाजन कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे प्रथम वर्ष प्रवेशित इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘इंडक्शन प्रोग्राम’ आयोजित केला होता. यादरम्यान वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यात्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. डी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या विविध प्रयोगशाळा तसेच सुविधांची माहिती दिली.

महाविद्यालयाचे ॲकेडेमिक डीन डॉ.पी.एम.महाजन यांनी विद्यार्थ्यांना विविध शाखांच्या अभ्यासक्रमाविषयी तसेच अभ्यासाच्या नियोजनाविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ.के.जी.पाटील यांनी प्रथम वर्षाला असलेला अभ्यासक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर जळगाव येथील “गती फाउंडेशनचे” देवदत्त गोखले, रश्मी गोखले यांनी विद्यार्थ्यांना “कम्युनिकेशन स्किल” विषयावर मार्गदर्शन केले. पुढील सत्रात धनाजी नाना महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ.जगदीश पाटील यांनी विद्यार्थ्यांना “अभियंत्यांच्या जीवनातील संवाद कौशल्याचे महत्त्व” याविषयी माहिती दिली. पुढील सत्रात डॉ.के.जी.पाटील यांनी “यशस्वी अभियंत्यासाठी वाचनाचे महत्त्व” विषयावर मार्गदर्शन केले. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ.जी.ई.चौधरी यांनी इंजिनिअरची निवड कशी होते. त्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक गोष्टींबद्दल मार्गदर्शन केले. पुढील सत्रात डॉ.पी.एम.महाजन यांनी विद्यार्थ्यांना न्यूमेरिकल ट्रिक्स तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम शाखेचे महत्त्व विषद केले. प्रा.विकास महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली योग सराव करण्यात आला. शेवटचे सत्र हे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे आयोजित केले होते. त्यात विद्यार्थ्यांनी गीत गायन सादर केले. अशा प्रकारे एक आठवडाभर “इंडक्शन प्रोग्राम” विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय पूरक पद्धतीने आयोजित करण्यात आला.

यासाठी प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा.वाय.आर.भोळे, डॉ.डी.ए.वारके, डॉ.ए.एम.पाटील, डॉ. के.एस.भगत, प्रा.डी.आर. पाचपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी प्रा.एम.डी.पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here