फैजपूर : प्रतिनिधी
येथून जवळील पाडळसे येथे भोई समाजासाठी विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सामाजिक सभागृहाची मागणी पुढे येत होती. त्या अनुषंगाने गावातील भोई समाजाच्या युवकांनी पाडळसे ग्रामपंचायतीकडे जागा मागणी केली होती. यासाठी पाडळसे ग्रामपंचायत आवारात पार पडलेल्या ग्रामसभेत जागा मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला. गावापासून जवळील गट नंबर १२३४ मध्ये भोई समाज सामाजिक सभागृह बांधण्याचे प्रस्तावित असल्याने त्या जागेवर साफसफाई करण्याचे काम पाडळसे येथील सरपंच पती ॲड. सुरज पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून सुरू करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य तुषार भोई, उपसरपंच अलका सोनवणे, पूनम पाटील, पांडुरंग कोळी, मनोज पाटील, माजी ग्रा.पं. सदस्य प्रकाश भोई, सुरज कोळी, दिलीप भोई, गिरीश भोई, गोविंदा भोई, गोपाल भोई, ज्ञानेश्वर भोई, प्रमोद भोई, सुपडू भोई यांच्यासह गावातील समाज बांधव उपस्थित होते.