जळगाव जिल्ह्यातून एका महिला आरोपीसह पाच जण हद्दपार

0
21

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

जिल्हाभरात व्ोगव्ोगळ्या पोलीस ठाण्यात घरफोड्या, चोरी आणि अन्य गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल असलेल्या टोळीप्रमुख महिलेसह पाच जणांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी काढले आहे. चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचे नेतृत्व एखादी महिला गुन्हा करते आणि तिच्यावर हद्दपार होण्याची वेळ येते, ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये भावना जवाहरलाल लोढा (वय ३८, रा. अयोध्यानगर), टोळी सदस्य अनिल रमेश चौधरी (वय ४०, रा. अयोध्यानगर), सैय्यद सजील सैय्यद हारुन (वय २६, रा. मास्टर कॉलनी, मेहरुण), सैय्यद आमीन सैय्यद फारुख पटव्ो ऊर्फ बुलेट (वय २६, रा. मास्टर कॉलनी, मेहरुण), सैय्यद अराफत सैय्यद फारुख (वय ३४, रा.तांबापुरा) यांचा समाव्ोश आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्याकडील हद्दपारीच्या प्रस्तावानुसार महिला आरोपीसह पाच जणांविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाणे, जामनेर पोलिस ठाणे, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे, पहूर पोलिस ठाणे, चाळीसगाव शहर पोलिस ठाणे, नशिराबाद पोलिस ठाणे, चाळीसगाव रेल्व्ो पोलिस ठाण्यात एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या पाचही जणांनी सदरचे गुन्हे टोळीने केले. तसा प्रस्ताव जळगाव पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे आल्यानंतर सदर प्रस्तावाची उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशी करुन त्यात माहिती निष्पन्न झाल्याने त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.
पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, इमरान सैय्यद, साईनाथ मुंडे, जमील शेख, निलोफर सैय्यद, इम्तियाज खान यांनी सदरचा प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षकांकडे पाठविला. या प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनील दामोदरे यांनी पाहिले. या प्रस्तावानुसार पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पाचही जणांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here