साईमत, जामनेर : प्रतिनिधी
शहरातील वाकी रोड भागातील फेस्कॉम संलग्न असलेला स्वाभिमानी ज्येष्ठ नागरिक संघाची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी संघाचे संस्थापक-अध्यक्ष डी.डी.पाटील होते. सभेला संतोष पाटील, सचिव भगवान पाटील, उपाध्यक्ष कडूबा पाटील, उत्तम पाटील, पंडित दुबे, भीमराव पाटील सिल्लोड, प्रल्हाद साबळे यांच्यासह सभासद उपस्थित होते.
सभेत विषय सुचीतील सर्व विषयावर सखोल चर्चा करून ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. आपल्या संस्थेचे अजूनही बँकेत खाते उघडले नसल्याचे अध्यक्षांनी सांगितले. म्हणून अध्यक्ष व सचिव यांच्या नावाने संयुक्त खाते राष्ट्रीयकृत बँकेत उघडावे, असे ठरविण्यात आले. २०२२-२३ चा अहवाल व जमा खर्च टाळ्या बंदलाही सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. २०२३ -२४ चे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. आपण ज्या एडिटरकडे नेहमीच एडिट करतो त्यांच्याकडूनच पुढील वर्षाचे सुद्धा एडिट करावे, असे ठरले. पंडित माधवराव दुबे हे एसटी खात्यातून निवृत्त झालेले कर्मचारी नवीन सभासद म्हणून करण्यात आले. त्यालाही सर्वांनी मंजुरी दिली आहे.