Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»भारताने ॲथलेटिक्समध्ये रचला इतिहास ः मोडला आशियाई विक्रम
    क्रीडा

    भारताने ॲथलेटिक्समध्ये रचला इतिहास ः मोडला आशियाई विक्रम

    Kishor KoliBy Kishor KoliAugust 27, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बुडापेस्ट (हंगेरी) : वृत्तसंस्था

    बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताच्या पुरुष संघाने या चॅम्पियनशिपच्या ४४०० मीटर रिले शर्यतीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.भारतीय संघ प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.
    जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३मध्ये भारताला आतापर्यंत एकही पदक मिळालेले नाही. यावेळी देश नीरज चोप्राची वाट पाहत होता. दरम्यान, भारतीय पुरुषांच्या ४४०० मीटर रिले संघाने शनिवारी चमकदार कामगिरी केली आणि भारतासाठी आणखी एका पदकाच्या आशा उंचावल्या. भारतीय पुरुष रिले संघाने ४४०० मीटर स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. भारतासाठी हा एक ऐतिहासिक क्षण होता.
    मोहम्मद अनस याहिया, अमोज जेकब, मोहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश यांच्या भारतीय संघाने हीट १ मध्ये धाव घेतली आणि दुसरे स्थान मिळविले.मुहम्मद अनास याहिया, अमोज जेकब, मुहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश या भारतीय चौकडीने हे संस्मरणीय यश मिळवले. भारतीय पुरुष संघाने ४४०० मीटर रिले शर्यतीत २:५९.०५ अशी वेळ नोंदवून आशियाई विक्रम मोडला. यापूर्वीचा विक्रम जपानच्या खेळाडूंच्या नावावर होता (२ मिनिटे ५९:५१ सेकंद). भारतीय संघाने अमेरिकेनंतर दुसरे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
    अव्वल स्थानावर राहून अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या अमेरिकेविरुद्ध भारताला हीट-१ मध्ये ठेवण्यात आले होते. अमेरिकन खेळाडूंनी ही शर्यत दोन मिनिटे ५८.४७ सेकंदात पूर्ण केली. भारत शर्यतीत ग्रेट ब्रिटन आणि बोत्सवानासारख्या संघांपेक्षा पुढे होता, ही कामगिरी आश्चर्यकारक होती.जमैका (२:५९:८२ सेकंद), फ्रान्स (३:००:०५ से.) आणि इटली (३:००:१४ से.) आणि नेदरलँड (३:००:२३ से.) यांनी हीट-२ मधून अंतिम फेरीत प्रवेश केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Jalgaon : महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे मंत्री रक्षाताई खडसे

    March 8, 2026

    India vs England Semi-Final: उपांत्य फेरीत टीम इंडियाचा प्लेइंग 11 निर्णय, बेंचवर बसणार हे चार महत्त्वाचे नाव

    March 5, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.