Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»अमळनेर शहरातील रस्ते कात टाकणार
    अमळनेर

    अमळनेर शहरातील रस्ते कात टाकणार

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 27, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

    राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी शहरातील रस्त्यांसाठी १० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. ना.अनिल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शहरातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत १० कोटी निधीस मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अमळनेर शहरातील रस्ते कात टाकणार आहेत. याच निधीतून विविध प्रभागात रेट्रो फिटिंग पथदिवे, योगा हॉल आणि भूखंड सुशोभीकरण आदी कामे होणार आहेत. या कामांची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे यातील बहुतांश रस्ते हे अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक ९ म्हणजे मुख्य बाजारपेठ परिसरातील आहे. या नव्या रस्त्यांमुळे व्यावसायिक व नागरिकांची समस्या सुटणार आहे. या कामांतर्गत काही रस्ते ट्रीमिक्स काँक्रीटीकरणासह होणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्यावतीने २३ ऑगस्ट रोजी उपसचिव प्रशांत आंडगे यांच्या स्वाक्षरीने अमळनेर नगरपरिषदेसाठी प्रसिद्ध झाला आहे. अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून ही सर्व विकास कामे होणार असल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

    रस्त्यांच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार

    भुयारी गटारीच्या कामापासून शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाल्याने या रस्त्यांना नागरिक अक्षरशः वैतागले होते. पावसाळ्यात तर नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. बाजारपेठ परिसरातील रस्त्यांची अशी वाईट अवस्था असल्याने शहराच्या सौंदर्यात कुठेतरी बाधा निर्माण झाली होती. त्यामुळे प्रभाग ९ मधील न्यू प्लॉट परिसर विकास मंचच्या सर्व पदाधिकाऱ्यांनीही ना.अनिल पाटील यांची भेट घेऊन रस्त्यांचे नूतनीकरण व्हावे, अशी मागणी केली होती. याशिवाय इतर प्रभागातील नागरिकांनी रस्त्यांची मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना.अजित पवार, नगरविकास मंत्री यांच्या सहकार्याने वैशिट्यपूर्ण योजनेंतर्गत १० कोटी निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच रस्त्यांची टेंडर प्रोसेस व वर्क ऑर्डर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

    दहा रस्त्यांचे नूतनीकरण होणार

    ना. अनिल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मिळालेल्या १० कोटी निधीपैकी प्रत्यक्ष ७ कोटी ३० लाखाच्या निधीतून दहा रस्त्यांचे नूतनीकरण होणार आहे. त्यात पिंपळे रस्ता ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे (२ कोटी), प्रभाग क्रमांक ९ मध्ये पाचपावली चौक ते वीर समशेरसिंग पारधी चौक ट्रीमिक्स रस्ता काँक्रीटीकरण करणे (८० लाख), पिंपळे रस्ता ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे(२ कोटी), बसस्टँड ते स्टेट बँक चौकपर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (८० लाख), दुर्गा टी ते डॉ.अंजली चव्हाण यांच्या दवाखान्यापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे (७० लाख), मंगलमूर्ती पतपेढी ते बीएसएनएल कार्यालयापर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (५० लाख), लालबाग टाकी ते बोहरी पेट्रोल पंपपर्यंत ट्रीमिक्स रस्ता काँक्रीटीकरण करणे (६० लाख), प्रभाग २ मध्ये अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे (५० लाख), आर.के.नगर भागात रस्ता ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे (४० लाख), सिंधी कॉलनी भागात रस्ता ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे (४० लाख), साळीवाडा परिसरात रस्ता ट्रीमिक्स काँक्रीटीकरण करणे (४० लाख) आदी रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे.

    पावणे तीन कोटीच्या निधीतून होणारी कामे अशी

    उर्वरित २ कोटी ७० लाख निधीपैकी दीड कोटी निधीतून विविध प्रभागात रेट्रो फिटिंगचे पथदिवे लागणार असल्याने अनेक प्रभाग चकाकणार आहेत. याशिवाय गट नं. १६८/११ व गट नंबर १४४/अ या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी ४० लाखाच्या निधीतून योगा हॉलचे बांधकाम, ४० लाखाच्या निधीतून गट नंबर १४३३ येथे खुला भूखंड विकसित केला जाणार आहे. महत्वपूर्ण रस्त्यांचा प्रश्न मंत्री अनिल पाटील यांनी मार्गी लावल्याने न्यू प्लॉट परिसर विकास मंच, बाजारपेठेतील व्यापारी बांधव, लहानमोठे व्यावसायिक इतर प्रभागातील नागरिकांनी मंत्री अनिल पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, ग्रामविकास ना.गिरीश महाजन यांचे जनतेच्यावतीने आभार व्यक्त केले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Amalner:चार जणांकडून साईड न दिल्याच्या वादातून व्यापाऱ्याच्या कारची तोडफोड

    February 20, 2026

    Amalner : अमळनेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गांजाची एक बिघा शेती उध्वस्त

    February 7, 2026

    Amalner : पिळोदे गावात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.