साईमत,धुळे : प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळांमधील मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी तसेच त्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळाव्ो यासाठी ‘भविष्यव्ोधी शिक्षण प्लस’ नावाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या संकल्पनेतून तयार होत असलेल्या शैक्षणिक गुणवत्ता व शैक्षणिक धोरणात या उपक्रमाचा समाव्ोश करण्यात आला आहे.
धुळे जिल्हा परिषदेच्या (कै.) यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे, शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे, माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद, धुळे, योजना शिक्षण विभाग, जिल्हा परिषद धुळे, जिल्हा गुणवत्ता कक्ष बैठक व जिल्हा गुणवत्ता आढावा तसेच एकदिवसीय शैक्षणिक गुणवत्ता व शैक्षणिक धोरण कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या कार्यशाळेस डाएटच्या प्राचार्या डॉ. मंजूषा क्षीरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतराव भदाणे, शिक्षणाधिकारी (योजना) पुष्पलता पाटील, वरिष्ठ अधिव्याख्याता जयश्री पाटील, जयप्रकाश पाटील, अधिव्याख्याता मिलिंद पंडित, चंद्रकांत पवार, डॉ. शिवाजी ठाकूर, गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, जी. एल. सुरवाडकर, राजेंद्र पगारे, सी. के. पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेत प्रारंभी चारही तालुक्यांतील एकूण दहा शिक्षकांनी नावीन्यपूर्ण उपक्रमांवर आधारित सादरीकरण केले. यात राकेश पाटील (जि. प. शाळा, खलाणे), दिनेश धनगर (जि. प. शाळा, वरपाडे, शिंदखेडा), विशाल चौरे (जि. प. शाळा, रांजणीपाडा), कुंदन माळके (जि. प. शाळा, शिरसोले), ललिता देसले (जि. प. शाळा, सुरपान, ता. साक्री), अर्चना वाणी (जि. प. शाळा, कापडणे), गोकुळ पाटील (जि. प. शाळा, निकुंभे), मंगला पाटील (जि. प. शाळा, वाडी), रत्नाकर सोनवणे (जि. प. शाळा, भरवाडे), कल्पना दशपुते (शिरपूर) यांचा समाव्ोश होता.
चर्चेनंतर नावीन्यपूर्ण उपक्रमांचा सहभाग शैक्षणिक धोरणात करण्याचे ठरले. या व्ोळी मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांनी शिक्षण विभागाच्या पायाभूत सुविधांवर आपला भर असू, त्यासाठी १५ कलमी शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.