अमळनेर धार रस्त्यावरील टेकडीचे शिवटेकडी ट्रेकिंग स्पॉट नामकरण

0
37

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

शहराच्या उत्तरेस धार रस्त्यावरील मारुती मंदिर जवळील टेकडीचे शिवटेकडी ट्रेकिंग स्पॉट असे नामकरण पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. लोकसहभागातून टेकडीचा विकास करा, नागरिकांना निसर्गरम्य वातावरणात ट्रेकींगचे आवाहन करा. मात्र, याठिकाणी व्यसनाधीन लोकांना आणि गैरप्रकार करणाऱ्या लोकांना येऊ देऊ नका, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देऊन ट्रेकिंग करणाऱ्यांनीच काळजी घेऊन पोलिसांना कळविण्याचे आवाहनही पोलीस निरीक्षक शिंदे यांनी केले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अनिल शिंदे, डॉ.संदीप जोशी, दिगंबर महाले, कुणाल पाटील, माजी नगरसेवक प्रताप शिंपी उपस्थित होते.

शहराबाहेरील टेकडी ओसाड पडलेली होती. त्यामुळे प्रताप शिंपी, जीवन पवार आणि त्यांच्या मित्र परिवाराने ही टेकडी विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. टेकडीच्या नामकरणप्रसंगी हितेश चिंचोरे, श्रीकांत शिंपी, सुनील पाटील, अमोल चौधरी, बंटी चौधरी, जितू ठाकूर, मनोज जोशी, रवींद्र पाटील, सुनील पाटील, विजय पाटील, संजय पाटील, सुरज शिंपी, संदीप पाटील, हिरामण पाटील, जिजाबराव पाटील, जगदीश पाटील, राजेंद्र पाटील, नाना चौधरी, भरत ठेकेदार, आप्पा पगारे, गोटू मराठे, किशोर पाटील, राजू राजस्थानी, श्री.माळी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here