साईमत, जळगाव, प्रतिनिधी
देशाच्या रक्षणासाठी घरादाराचा त्याग करून सीमेवर लढणाऱ्या सैनिक बांधवांसाठी हृदयाचे भावा-बहिणीचे नाते जपणारा रक्षाबंधन सणानिमित्त दरवर्षाप्रमाणे आपले कर्तव्य मानून नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे ५०० राख्या पाठविण्यात आल्या. या भावा-बहिणीचे नाते दृढ करणाऱ्या राख्या येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे पाठवण्यात आल्या. याप्रसंगी माननीय जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय रामराव गायकवाड, नितीन पाटील, रतिलाल महाजन आदी उपस्थित होते.
या राख्या सीमावरती भागात असलेल्या सैनिक बांधवांसाठी लेह,लद्दाख, तवांग, सिक्कीम, नभुला पास, पुंछ सेक्टर,तंगधार इत्यादी ठिकाणी पाठविण्यात आल्या. सैनिक कल्याण कार्यालयास या राख्या पाठवण्यासाठी सोपविण्यात आल्या. याप्रसंगी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनिषा पाटील, नेहा जगताप, विजया पांडे, नीता वानखेडकर उपस्थित होत्या.