Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»जिल्ह्यात ८५ गावठी हातभट्ट्यांवर कारवाई; सव्वा ५ लाखांचा मुद्देमाल केला नष्ट
    क्राईम

    जिल्ह्यात ८५ गावठी हातभट्ट्यांवर कारवाई; सव्वा ५ लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

    SaimatBy SaimatAugust 19, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, प्रतिनिधी, जळगाव

    जिल्हा पोलीस दल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्हाभरात गावठी हातभट्ट्यांवर कारवाई; सव्वा ५ लाखांचा मुद्देमाल केला नष्ट
    धडक कारवाई करण्यात आली. यात जिल्ह्यातील ८५ ठिकाणी कारवाई करून ५ लाख ३२ हजार ८८५ रुपये किमतीचा दारू बनवण्याचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी शनिवारी दुपारी १ वाजता प्रसारमाध्यमांना दिली.
    जिल्ह्यात गावठी हातभट्टीच्या दारूमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे अनेकांना जीवदेखील गमावला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ व्ही.टी. बुकन यांचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने जिल्ह्याभरात ८५ ठिकाणी कारवाई केली. यात एकूण ५ लाख ३२ हजार ८८५ रुपयांचे कच्चे रसायन आणि हातभट्टीची तयार केलेली दारू पोलिसांनी नष्ट केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्याभरात एकच खळबळ उडाली आहे.

    राज्य उत्पादन विभाग व पोलीस दलाने अशी केली संयुक्त कामगिरी
    जिल्हा पोलीस दल व राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी संयुक्तरित्या विशेष मोहीम राबवली. यात जिल्हाभरातील पोलीस दलाने ६५ ठिकाणी कारवाई करून ३ लाख ९६ हजार ०८५ रुपयांचे २५हजार २५६ लिटर कच्चे रसायन नेट केले. तरव ७७२ लिटर तयार गात्तठी दारू नष्य केली.
    राज्य उत्पादन शुल्क विभागाने २० ठिकाणी कारवाई करत १ लाख ३६ हजार ८०० रुपयांचे १५ हजार २५० लिटर कच्चे रसायन व ४४० लिटर गावठी हातभट्टीची दारू नष्ट केली.

    जिल्ह्यात २९८ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली कारवाई
    या कारवाईसाठी पोलीस दलाचे ४६ पोलीस अधिकारी, २२२ पोलीस कर्मचारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ६ अधिकारी आणि २४ कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान गावठी हातभट्टीवाल्यांवर गुन्ह्यांचे रेकॉर्डवरून आतापर्यंत पोलीस दलातर्फे २ तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १ अशा तीन जणांवर एमपीडीएच्या कारवाई अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. दरम्यान आता यापुढे देखील गावठी हातभट्टी दारू तयार करणे व विक्री करणाऱ्यांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Shendurni : शेंदुर्णीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य लोकार्पण

    March 15, 2026

    Faizpur : फैजपूर शहरात मुक्ताई पालखी सोहळा

    March 15, 2026

    Bhusawal : पाडळसे शिवमहापुराण कथास्थळावर प्रशासनाचे आदेश दुर्लक्षित

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.