Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगार ‘एमपीडीए’अंतर्गत स्थानबध्द
    क्राईम

    जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगार ‘एमपीडीए’अंतर्गत स्थानबध्द

    saimatBy saimatAugust 18, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम अबाधित रहावी, यासाठी एमपीडीए कायद्यांतर्गत भुसावळ तालुका पोलीस ठाणे आणि चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्हेगारांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबध्द करण्याचे आदेश शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता काढले आहे. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला विविध गुन्हे दाखल असलेला इब्राहीम उर्फ टिपू उर्फ टिप्या साततार मण्यार (रा. वराडसीम, ता. भुसावळ) आणि आकाश संतोष भोई (रा. साने गुरुजी वसाहत, चोपडा) असे स्थानबद्ध केलेल्या दोघांची नावे आहेत.

    सविस्तर असे की, भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला इब्राहीम उर्फ टिपू याच्याविरुद्ध ३ गुन्हे, एमआयडीसी पोलीस स्टेशनला २ तर फैजपूर आणि शनीपेठ पोलीस स्टेशनला प्रत्येकी एक असे ७ गुन्हे दाखल आहेत. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या आहेत. तरीही त्याच्या गुन्हेगारीच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करत त्याची पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.

    नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी

    चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकाश संतोष भोई याच्याविरुध्दही सात गुन्हे दाखल आहेत. तसेच अदखलपात्र गुन्हे, प्रतिबंधात्मक कारवाईही केली आहे. त्याच्याविरुद्धही वरील प्रमाणेच कृत्य केल्याने चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे प्रस्ताव पाठविला होता. त्या प्रकरणीही जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानबध्दतेचे आदेश दिले. त्यानुसार चोपडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी केली. या कारवाईकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासह त्यांचे सहकारी आणि संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगावात एचपीव्ही लसीकरण मोहिमेची धडक सुरुवात १४ वर्षांखालील मुलींना मोफत लस

    March 11, 2026

    Jalgaon : पिंप्राळा स्मशानभूमीत ५० झाडांचे रोपण नागरिकांसाठी सिमेंट बेंचचे लोकार्पण

    March 11, 2026

    Jalgaon:जळगावात आदिवासी समाजाचे ‘रस्ता रोको’ आंदोलन

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.