Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
    यावल

    सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

    SaimatBy SaimatAugust 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत यावल प्रतिनिधी

    यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मंगळवार दि.15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

    सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये स्वतंत्रता दिन साजरा करताना कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सैन्य दलात १८ वर्ष कार्यरत असलेले सूर्यभान पाटील, संस्था सदस्य शशिकांत फेगडे , शाळेतील पालक समितीचे सर्व सदस्य, शहरातील मान्यवर यांची उपस्थिती होती.

    सर्वात प्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . तसेच राष्ट्रगीत म्हणून भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास सुरुवात करण्यापूर्वी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुख्याध्यापिका शिला तायडे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

    सर्व विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्यात आपले कला कौशल्य सादर करून स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व जल्लोषात पार पाडला. तद्नंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. संस्था अध्यक्ष राजेंद्र महाजन, दिपक महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा भुते, मंजुषा साळुंखे यांनी केले. प्रशांत फेगडे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वर्गाने कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. तसेच सर्व पालकांनी देखील आजच्या कार्यक्रमास उपस्थिती देऊन सहकार्य केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026

    Yaval Sakli : यावल साकळी फाटा कुत्र्यामुळे नियंत्रण सुटले, युवकाचा मृत्यू

    March 5, 2026

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.